logo

काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळात फळवाटप व छत्रीवाटप उपक्रम



यवतमाळ:- राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत आज दिनांक ३१ ऑगस्ट (रविवार) रोजी विविध उपक्रम राबविण्यात आले.
स्व.वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय,यवतमाळ येथे रुग्णांना फळवाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन शहर काँग्रेस अध्यक्ष प्रा.डॉ.बबलू उर्फ अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आले.रुग्णांना दिलासा देत दादांना दीर्घायुष्य व निरोगी जीवनाच्या शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक १० मधील सफाई कामगारांना छत्र्या वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला.हा उपक्रम राज्याचे काँग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव जावेद भाऊ अन्सारी मित्रपरिवार, यवतमाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.सफाई कामगारांचा सन्मान करत समाजहितासाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प या कार्यक्रमातून दृढ करण्यात आला.
या दोन्ही उपक्रमांना काँग्रेस पक्षाचे अनेक मान्यवर,पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.यामध्ये काँग्रेसचे प्रदेश सचिव जावेद अन्सारी, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रफुल्ल मानकर,शहर काँग्रेस अध्यक्ष प्रा.डॉ.बबलू उर्फ अनिल देशमुख,तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमेश भिसणकर,माजी सभापती नंदू कुडमेथे,ऍड.सीमा तेलंगे,छोटू सवाई,फैजल पटेल, ओम तिवारी,अवधूत जमुणकर,सुनील बोरकर,अजय, जरार खान,गुलाब सोळंकी,मुकुंद ठाकरे,किशोर गजभिये,रामदास राऊत,कॉम्रेड सचिन मनवर,संघपाल बारसे आदींसह जावेद भाऊ अन्सारी मित्रपरिवाराचे सर्व सदस्य, परिसरातील नागरिक व सहकारी मित्र उपस्थित होते.

13
631 views