logo

हिंदी अध्यापक मंडळाच्या विचारसभेत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड : अध्यक्ष – राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष – योगेश्री पाटील, सचिव – नारायण चौधरी”

“हिंदी अध्यापक मंडळाच्या विचारसभेत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड : अध्यक्ष – राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष – योगेश्री पाटील, सचिव – नारायण चौधरी”

अमळनेर प्रतिनिधी :
हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या हिंदी अध्यापक मंडळाची विचारसभा नुकतीच अमळनेर येथे उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडली. या सभेत स्व. आबासो अनिल अंबर पाटील विद्यालय, मंगरूळ येथील मनमिळावू व विद्यार्थीप्रिय शिक्षक राजेंद्र श्रीराम पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याचप्रमाणे श्रीमती योगेश्री एम. पाटील (डी.आर. कन्या शाळा हायस्कूल, अमळनेर) यांची उपाध्यक्ष तर नारायण रमण चौधरी (मुख्याध्यापक, निंभोरा हायस्कूल) यांची सचिव म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
या वेळी बोलतांना ज्येष्ठ शिक्षक व हिंदी सभेचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले –
"हिंदी अध्यापक मंडळ हे केवळ पदांचा कारभार नाही, तर एक परिवार आहे. या परिवाराने नेहमीच सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहून विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. नूतन पदाधिकाऱ्यांनी ही परंपरा पुढे नेऊन मंडळाचे नाव सदैव उज्ज्वल ठेवावे हीच अपेक्षा आहे."
मावळते अध्यक्ष आशिष शिंदे यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा मांडताना सांगितले की, “मंडळाने केलेले कार्य हे प्रत्येक सदस्याच्या योगदानामुळे यशस्वी झाले. आता नवीन पदाधिकाऱ्यांनी आणखी प्रेरणादायी उपक्रम राबवावेत.”
मार्गदर्शक व माजी अध्यक्ष दीपक पवार यांनी प्रस्ताविक करत हिंदी अध्यापक मंडळाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंडळाचे काम हे नेहमीच दीपस्तंभ ठरले आहे. हे कार्य सातत्याने चालू राहावे.”
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी एकमताने सांगितले की – “हिंदी अध्यापक मंडळ हा एक परिवार आहे. पद कोणाचे आहे यापेक्षा आपण सर्व एकत्र आहोत हे मोठे आहे.”
सहविचार सभेत आगामी १४ सप्टेंबर हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन करण्यात आले. प्रत्येक शाळेत हिंदी शिक्षकांच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत.
या प्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारी मंडळाचे दीपक पवार, आशिष शिंदे, दिलीप पाटील, ईश्वर महाजन, कविता मनोरे, प्रतिभा जाधव, श्रीमती साबे, प्रदीप चौधरी, सुनील पाटील, प्रशांत वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते.शेवटी
कार्यक्रमाचे आभार प्रदीप चौधरी यांनी मानले.


---

40
1001 views