१~साहेब ए.सी.च्या बाहेर निघून पाहा,
आम्ही जसे राहतो तसे एक दिवस राहुन पाहा.
२~साहेब आलीशान गाडीतुन उतरुन पाहा,
आमच्या
१~साहेब ए.सी.च्या बाहेर निघून पाहा,
आम्ही जसे राहतो तसे एक दिवस राहुन पाहा.
२~साहेब आलीशान गाडीतुन उतरुन पाहा,
आमच्यासारखे अॅटो, रिक्षा बसमधून प्रवास करुन पाहा.
३~साहेब भारीचे कपडे तुमचे एकदा आमच्याकडे पाहा,
आम्ही जसा धुराळा कपड्यावर घेतो, तुम्ही पण घेऊन पाहा
४~साहेब त्रस्त जनतेत एकदा येऊन पाहा,
आमच्यासारख रस्त्यावरील खड्डयांतुन प्रवास करुन पाहा.
५~साहेब निवडणूकीचे ते दृश्य आठवुन पाहा,
आमच्या गावा-गल्लीत आता एकदा येऊन पाहा.
६~साहेब आश्वासनांनी मने जिंकली,
परंतु प्रत्यक्ष कामकाजाने माणसे विखुरली.
७~आता काही ताण नाही,
पुढची निवडणूक येईपर्यंत तुम्हाला काही घोर नाही.
८~साहेब तुम्ही पिढ्यानपिढ्या ची कमाई केली,
आमची गोरगरीब जनता न्याय मागत मेली.
९~साहेब गोरगरीबांचा छळ करुन सुख भेटत नाही,
देवा-घरी गेल्यावर हिशोब शिल्लक राहत नाही..
१०~साहेब माणूस सोबत काही नेत नाही..
पण गोरगरीब जनता चांगले काम कधी विसरत नाही.
प्रशांत लोखंडे.......जनतेतुन पुढे.......