logo

थेपडे जुनिअर कॉलेज व सिनियर कॉलेजची पद्मालय येथे पायी सहल

म्हसावद तालुका जळगाव येथील स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय तसेच सिनियर कॉलेज महिला महाविद्यालय मिळून पद्मालय येथे क्षेत्रभेट निमित्ताने पायी सहल दिनांक 30 ऑगस्ट 2025 शनिवार रोजी काढण्यात आली सदर सहल निघतांना आदरणीय चेअरमन साहेब श्री केदारजी थेपडे सर, प्राचार्य आदरणीय श्री पी डी चौधरी सर,उपप्राचार्य आदरणीय श्री जी डी बच्छाव सर, पर्यवेक्षक आदरणीय श्री के पी पाटील सर यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यालयातून सकाळी आठ वाजता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पद्मालय येथे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची सहल निघाल्यानंतर प्रथमतः बारा ज्योतिर्लिंग देवस्थान पद्मालय रोड येथे सर्व विद्यार्थ्यांनी दर्शन घेतले त्यानंतर सकाळी दहा वाजता पद्मालय येथे विघ्नहर्ता गणपतीचे सर्व विद्यार्थ्यांनी मनोभावे दर्शन घेतल्यानंतर गाभाऱ्यात बसून सर्वांनी प्रार्थना केली यावेळी पद्मालय संस्थांनाचे मुख्य विश्वस्त श्री.आनंदराव पाटील यांनी मंदिर व परिसराची तसेच डाव्या व उजव्या सोंडेच्या गणपतीची पौराणिक व ऐतिहासिक सखोल माहिती दिली विद्यालयाचे प्राचार्य श्री पी डी चौधरी सर यांनी विश्वस्तांचे आभार मानले.तदनंतर सर्व विद्यार्थ्यांना पोह्यांचा नाश्ता देण्यात आला. नाश्त्याचा आस्वाद घेतल्यानंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक बंधू भगिनी यांनी भिमकुंडाकडे प्रस्थान केले निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना डबे पार्टीचा आस्वाद घेता आला. यावेळी विघ्नहर्ता गणरायाचा उत्सवाचा पवित्र पर्वात थेपडे महाविद्यालयाचे विद्यार्थी पायी चालत आल्याने विश्वस्तांनी सर्वांचे कौतुक केले गणराया वरील खरा भक्तीभाव आपणा सर्वांकडून प्रकट झाला असेही ते म्हटले व या स्तुत्य उपक्रमाचे प्राचार्य सो चेअरमन साहेब व संपूर्ण शालेय परिवाराचे त्यांनी आभार मानले परतीच्या वाटेला घरी येतांना सर्वजण भावूक झाले होते. दुपारी दोन वाजून 30 मिनिटांनी सर्व विद्यार्थी सुखरूप परत आले. या सालीचे विशेष म्हणजे इयत्ता अकरावीची पद्मालय येथील विद्यार्थिनी कुमारी मयुरी जैन हीने सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी कळण्याची भाकर व ठेचा बनवून खाऊ घातला.सर्व विद्यार्थी व जुनिअर कॉलेज शिक्षक बंधू-भगिनी विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.

55
2292 views