
*सावित्री कलयुगतील या मराठी चित्रपटातील टीमचा अमरावतीत भव्य सत्कार*
प्रतिनिधी (अमरावती) :- १७ ऑगस्ट रोजी बी एस एफ बहुउद्देशीय संस्था अमरावती, उपेक्षित नायक न्यूज आणि संतकबीर बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने "समाज क्रांती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५" अमरावती येथील हॉटेल राज पॅलेस येथे नुकताच पार पडला. त्यामध्ये विविध क्षेत्रात जसे नाटक, चित्रपट क्षेत्र, कवी, लेखक, डॉक्टर, वकील अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समावेश होता.
या कार्यक्रमास धुळे येथून सावित्री कलयुगातील या मराठी चित्रपटाचे निर्माते कराटे मास्टर नानासाहेब बच्छाव यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. कार्यकामाचे वेळी दीप प्रज्वलन सावित्री कलयुगातील या मराठी चित्रपटाचे निर्माते नानासाहेब बच्छाव व प्यारेलाल शर्मा सरांनी केले. या चित्रपटाचे रायटर, डायरेक्टर पयरेलालजी शर्मा यांनी निर्माते कराटे मास्टर नानासाहेब बच्छाव यांना सन्मानपत्र आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी अभिनेत्री श्वेता भामरे, मेकअप आर्टिस्ट वंदना सूर्यवंशी हे उपस्थित होते. बी एस एफ अमरावतीच्या टीमने त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र भर त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा पाऊस पडत आहे.