logo

"वसमत उडाण पुलावरील खड्डे न बुजवल्यास भिक मागो आंदोलन -प्रशांत लोखंडे" "खड्ड्यांमुळे होतात दररोज अपघात"शालेय विद्यार्थी

"वसमत उडाण पुलावरील खड्डे न बुजवल्यास भिक मागो आंदोलन -प्रशांत लोखंडे"
"खड्ड्यांमुळे होतात दररोज अपघात"शालेय विद्यार्थी व नागरिक त्रस्त"
हिंगोली प्रतिनिधी
काशिनाथ नाटकर
वसमत महामार्ग वरील उडाण पुलावरील रस्त्यावर भयानक आणि मोठ मोठे खड्डे पडले असून दररोज असंख्य नागरिक यामध्ये शालेय विद्यार्थी, रुग्ण, व्यावसायिक, नोकरवर्ग, महिला, वृद्ध, वाहन चालक, आदींना याच मार्गाने प्रवास करावा लागतो आहे. यादरम्यान दररोज अपघात होत असल्याचे नेहमीच नागरिकांकडून चालकांकडून प्रवाशांकडून ऐकायला मिळते. काही दिवसांपूर्वी खड्यात एक खाजगी बस अडकली होती. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही, परंतु मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याबद्दल सर्वांना माहीत आहे परंतु याकडे दुर्लक्ष होताना दिसते. या खड्ड्यांमुळे एखादी मोठी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? हा प्रश्न सुद्धा नागरिकांनी मांडला आहे. दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला असता अतिशय तळमळीने ते बोलत होते की रस्ता चांगला करा फार कसरत करावी लागते आहे.एका शालेय विद्यार्थ्यांने त्याची व्यथा मांडली तेव्हा अक्षरशः त्या विद्यार्थ्यांला किती त्रास सहन करत शाळेसाठी जावे लागते हे समजले. तो विद्यार्थी बोलताना म्हणाला की, घरुन आम्ही आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून येतो मात्र या खड्ड्यांमधील घाण पाणी मोठ्या वाहनांमुळे आमच्या अंगावर येत आमचे कपडे भरतात परिणामी आम्हाला शाळेला न जाता घरी जाव लागत तर कधी कधी आम्ही या खड्ड्यांमुळे पडतो. असे म्हणत तो रस्ता दुरुस्ती संबंधी वारंवार सांगत होता.एखादी बातमी प्रकाशित झाली तर तात्पुरत्या स्वरूपात खडक टाकतात दोन दिवसांत तो सुद्धा गायब. 'खड्डे जैसे थे वैसे'
या प्रकारामुळे थोरावा येथील प्रशांत लोखंडे यांनी या रस्त्यावरील खड्डे शुक्रवार शनिवारी पर्यंत
कायमस्वरूपी प्रशासनाने न बुजवल्यास शासनाकडे खड्डे बुजवण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत म्हणून दिनांक ३१ आॅगष्ट २०२५ वार रविवार पासुन "भिक मागो आंदोलन" करण्यात येणार आहे. असे निवेदनामार्फत प्रशासनाला कळविले आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घेऊन दररोज नागरिकांचे होणारे हाल लक्षात घ्याव्यात तसेच मोठी दुर्घटना टाळावी असे आवाहन प्रशासनाकडे प्रशांत लोखंडे थोरावेकर यांनी केले आहे.

0
28 views