ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी हे पाऊल निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार:आ.राजळे
श्री वृद्धेश्वर सहकारी तालुका दुध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादित, पाथर्डी तालुका दुध संघाच्या हंडाळवाडी येथील दुध शीतकरण केंद्राच्या नूतनीकरण व अत्याधुनिक दुध शीतकरण यंत्रसामुग्रीचे उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला.
या नव्या सुविधेमुळे दुध संकलन व साठवण अधिक सक्षम पद्धतीने होणार असून शेतकरी बांधवांना दर्जेदार व वेळेवर सेवा उपलब्ध होणार आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी हे पाऊल निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.नारायण बापू धस (माजी चेअरमन अहमदनगर जिल्हा दूध संघ), श्री.गिरीश सोनोने (जिल्हा दुग्ध शाळा विकास अधिकारी), श्री.तुळशीराम भोजने (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दुग्ध अहमदनगर, दूध संकलन अधिकारी व्ही.आर.एस फूड्स, श्री.आहेर अहिल्यानगर तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, दुध उत्पादक, संघाचे संचालक मंडळ व इतर मान्यवर उपस्थित होते.