
लातूर एलआयसी हाऊसिंग फायनान्स मध्ये मनमानी कारभार मॅनेजरचा
लातूर एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये मनमानी कारभार – मॅनेजरच
लातूर एलआयसी हाऊसिंग फायनान्स मध्ये मनमानी कारभार मॅनेजरचा
लातूर एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये मनमानी कारभार – मॅनेजरच्या वागणुकीवर एजंट व ग्राहक त्रस्त
लातूर प्रतिनिधी
लातूर येथील एलआयसी हाऊसिंग फायनान्स कार्यालयात सध्या मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप एजंट आणि ग्राहकांकडून केला जात आहे. नुकतेच कोल्हापूर क्लस्टरमधून बदली होऊन आलेले मॅनेजर रोहन देवकर यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांची दिशाभूल करणे आणि त्यांच्या फाईल्स अनेक महिने प्रलंबित ठेवणे असे प्रकार या कार्यालयात सर्रास सुरू आहेत. यामुळे ग्राहक आणि एजंट्स यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एजंट्सचा व्यवसाय कमी होत असल्यामुळे त्यांचे मनोबल खचत आहे, असेही बोलले जात आहे.
या संदर्भात, औरंगाबाद येथील एजंट आणि लातूर Fsl मॅनेजर देवकर यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, देवकर "मी मॅनेजर आहे, माझ्या पद्धतीनेच काम होणार" अशा प्रकारची दादागिरी करतात. कार्यालयात सहाय्यक मॅनेजर प्रत्येक ग्राहकाला देखील अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे सांगितले जाते.
एजंट्स सांगतात की, ते दिवस-रात्र मेहनत करून व्यवसाय मिळवतात, पण कार्यालयात आल्यावर त्यांना अपमानास्पद वागणूक मिळते. "एजंट्सना कुत्र्यासारखी वागणूक दिली जाते," अशी तीव्र भावना अनेक एजंट्सनी व्यक्त केली आहे.
या प्रकारामुळे लातूरच्या एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित उच्च अधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालून योग्य कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे
Write Your Comment...