
श्रीगोंदा येथील कोंडेगव्हाणमध्ये युवक ठरत आहेत कोरना योद्धे*
तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये तसेच शहरामध्ये सामाजिक संघटना व युवक कार्यकर्ते आपापल्या परीने समाजाचे देणे म्हणून, माणुसकी जपण्याच्या उद्देशाने कोरोना संक्रमनामध्ये मदत व सहकार्य करून आपल्या कार्यातून उतराई होत आहेत.
कोंडेगव्हाण गावांमध्ये काही तरुणांनी पुढाकार घेत लोकांना जीवनावश्यक वस्तूंसह मेडिकल संसाधने उपलब्ध करून दिलेली आहेत. या उपक्रमाबद्दल त्यांचे ग्रामस्थांसह तालुक्यातील जनतेकडून कौतुक होत असून, खरे कोरोना योध्या असल्याचे बोलले जात आहे.
कोंडेगव्हाण गावामध्ये युवा उद्योजक श्री. महेशशेठ कुलथे व मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून तसेच (ग्रामपंचायत सदस्य) श्री. तुकाराम धांडे, (ग्रामपंचायत सदस्या) सौ. प्रियांका गुंजाळ, (ग्रामपंचायत सदस्या) सौ. अलका डोंगरे, (माजी ग्रामपंचायत सदस्य) श्री. भीमसेन मगर यांच्या संयुक्त विद्यमानाने वाढत्या कोरोना आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी वाफ घेण्याच्या तब्बल २४१ प्रत्येकी कुटुंबास इलेक्ट्रॉनीक मशीन [स्टीमर] व मास्क यांचे मोफत वाटप करीत गावामधील गरजु कुटुंबांना किराणा वाटप केले. त्याचबरोबर कोरोना आजाराविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
यावेळीह.भ.प.महादेव महाराज धांडे, ह.भ.प. अशोक महाराज जाधव, माऊली डोंगरे, बाळासाहेब वाळके, दादा शिर्के, विशाल कदम, ऋषिकेश पवार, तुषार मगर, सूरज मगर, गोपीनाथ शेळके,गणेश गोसावी, बाळासाहेब दिवटे, सुभाष डोंगरे, संतोष भाडूळे, आदिनाथ मगर. आदींच्या हस्ते वाटप करण्यात आले.