कोपर्शीच्या जंगलात आठ तास धुमशान ४ माओवादी ठार
कोपर्शीच्या जंगलात आठ तास धुमशान ४ माओवादी ठारbykhabardar Maharashtra-August 27, 20250गडचिरोली :गडचिरोली नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात सोमवारी पोलिस व माओवादी यांच्यात तब्बल आठ तास भीषण चकमक झाली. यात ४ जहाल माओवादी (१ पुरुष व ३ महिला) ठार झाले असून, घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.दिनांक २५ ऑगस्ट रोजी गडचिरोली विभागातील गट्टा दलम, कंपनी क्रमांक १० व इतर माओवादी दबा धरून बसल्याची विश्वासार्ह माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली C-60 ची १९ पथके व CRPF QAT ची २ पथके जंगल परिसरात रवाना करण्यात आली होती.सदर भागात प्रचंड पावसादरम्यान दोन दिवस शोधमोहिम सुरू होती. अखेर सोमवारी सकाळी पोलिस पथके परिसरात दाखल होताच माओवादींनी अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही तात्काळ प्रभावी प्रत्युत्तर देत मोठी कारवाई केली.आठ तास चाललेल्या या धुमशानानंतर शोध घेतला असता १ पुरुष व ३ महिला अशा चार माओवादींचे मृतदेह पोलिसांना मिळून आले. याशिवाय घटनास्थळावरून १ SLR रायफल, २ INSAS रायफल व १ .303 रायफल असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.दरम्यान, संपूर्ण परिसरात अजूनही माओवादविरोधी मोहीम सुरू असून उर्वरित माओवादींचा शोध पोलिसांकडून युद्धपातळीवर घेतला जात आहे.