
ऐन सणासुदीच्या काळात स्थानिक भूमिपुत्रांवर झाला अन्याय !!!!!
पगार थकवला …
दि.२७/०८/२०२५ संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे . ठिकठिकाणी बाप्पाचे आगमन होत असताना मात्र मनोर येथील निर्मल बिल्डिनफ्रा प्राइवेट लिमिटेड या कंपनीने सिक्योरिटी म्हणून काम करत असणाऱ्या वीस ते पंचवीस कामगारांचे वेतन मागील दोन महिन्यांपासून थकवले होते. राहुल घाटाळ या स्थानिक युवक कामगाराने कंपनीच्या मैनेजमेंटला वारंवार सांगून विनंती करून सुद्धा कंपनीचे मैनेजमेंट दुर्लक्ष करत होते. एचआर ला पगारासाठी विचारले असता , आज करतो, उद्या करतो अशी उडवा उडवीची उत्तरे देत होती. राहुल घाटाळ या कामगाराच्या बोलण्यावरून असे समजते की संबंधित निर्मल बिल्डिनफ्रा प्राइवेट लिमिटेड ही कंपनी राजस्थानची आहे. या कंपनीचे मुंबई अहमदाबाद महामार्गाचे काँक्रिटिकरणाचे काम करत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून येथे स्थानिक तरुण येथे सिक्योरिटी गार्ड म्हणून काम करत आहेत. वारंवार सांगून ही कामगारांचा पगार केला नाही. शेवटी कामगारांनी कंटाळून कामनीच्या विरोधात टोकाचे पाऊल उचलत तेथील ट्रैक्टर जप्त करतो , कामगारांचे बोलणे असे आहे की तुम्ही म्हणजे कंपनीने सर्व कामगारांचे थकीत वेतन आताच्या आता करा, नाहीतर आम्ही हा ट्रैक्टर जप्त करतो आणि येथील काम ही बंद करून टाकू !! शेवटी कंपनीच्या प्रशासनाने धास्ती घेऊन संध्याकाळी उशिरा प्रत्येकी कामगारांना ५००० /- पगार केला व उर्वरित पगार दोन दिवसात करतो असे आश्वासन कामगारांना दिले.