logo

रोजगार सेवक संघटना अक्कलकुवा

[26/08, 7:08 pm] +91 90217 87443: प्रति, दि.28/8/2025
मा. ना. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई.
मा. ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई.
मा. ना. श्री अजितजी दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई.
मा.ना. श्री भरतजी गोगावले साहेब रोहीयो मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
मा. श्री गणेशजी पाटील साहेब प्रधान सचिव रोहियो विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई.
मा. श्री भरत बस्टेवाड साहेब
आयुक्त रोहियो विभाग नागपूर.
मा.जिल्हाधिकारी साहेब , ......

मा. मुख्य कार्यपालन अधिकारी साहेब जिल्हा परिषद .....

(रोहीयो)
मा. पोलीस अधीक्षक साहेब .......
मार्फत:- मा.जिल्हाधिकारी....
संदर्भ:-नियोजन विभाग
महाराष्ट्र शासन निर्णय
क्र. मग्रारो -2024/
प्र.क्र.63/रोहयो-10अ
दि.3 ऑक्टोंबर 2024
नुसार.
विषय:-3 ऑक्टोंबर 2024 रोजी
चे शासन निर्णयानुसार
ग्राम रोजगार सहाय्यक
यांचे मानधन वितरण
करण्याबाबत

महोदय,
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, शासन निर्णय 3 आक्टोंबर 2024 ला ग्राम रोजगार सहाय्यकांना शासन निर्णयानुसार माहे ऑक्टोबर 2024 पासून ग्राम रोजगार सहाय्यक यांचे खात्यावर मानधन देण्याचे तत्कालीन माननीय नामदार मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देण्याचे ठरविलेले होते.
परंतु शासन निर्णय निघून जवळजवळ दहा महिन्याच्या कालावधी लोटून सुद्धा ग्राम रोजगार सहाय्यकांना शासन निर्णयानुसार आम्हाला मानधन मिळालेला नाही, तसेच . त्यामुळे आपला उदरनिर्वाह कसा भागवावा असा प्रश्नचिन्ह निर्माण होत असून ग्राम रोजगार साहाय्यकावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
तेव्हा आपणास नम्रतेची प्रार्थना करण्यात येते की 3 ऑक्टोंबर 2024 च्या शासन निर्णयानुसार आम्हाला त्वरित दिनांक .......ऑगस्ट 2025 पर्यंत मानधन देण्याची कृपा करावी.

अन्यथा आम्ही दिनांक ....... ऑगस्ट 2025 पासून बेमुदत काम बंद आंदोलन करीत असून जोपर्यंत तीन ऑक्टोंबर 2024 च्या शासन निर्णयाप्रमाणे आमचे खात्यावर मानधन मिळत नाही तोपर्यंत आमचा आंदोलन सुरूच राहील. तेव्हा शासनाने व प्रशासनाने नोंद घ्यावी संपकालीन सेवा ही सेवा समजावी हीच विनंती.
आपले विनीत

अध्यक्ष. सचिव
ग्राम रोजगार सहाय्यक संघटना
जिल्हा/तालुका शाखा ....
प्रतिलिपी सादर
मा. तहसीलदार साहेब
.....



मा. खंड विकास अधिकारी
साहेब प.स.......
मा.ठानेदार साहेब, पोलीस
स्टेशन ........
आपणास माहिती व योग्य कार्यवाही सादर.
[26/08, 7:08 pm] +91 90217 87443: मित्रांनो, 3 ऑक्टोंबर 2024 चा शासन निर्णय लागू करायचा असेल तर अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्षांनी, राज्य अध्यक्ष यांनी शासनापर्यंत जाऊ द्यावे.
जोपर्यंत आपण एकत्रित येऊन लढा देत नाही तोपर्यंत शासन निर्णय निघणार नाही मित्रांनो आपण सर्व हेवे दावे विसरून आपल्याला आपल्या न्याय हक्काच्या मागण्या करता एकच पर्याय आहे तो म्हणजे काम बंद आंदोलन आपण अनेक दिवसापासून पाहत आहात तीन ऑक्टोबर चा शासन निर्णय आता महिन्याभरात होईल पंधरा दिवसात होईल असे बोलून बोलून अवघे दहा महिने निघुन गेलेत परंतु शासन निर्णय लागू झालेला नाही.
मी जास्त लिखाण करणार नाही परंतु आपण सर्वांना एक आग्रही विनंती करतो की आपण कोणत्याही संघटनेचे राज्य अध्यक्ष असो, जिल्हाध्यक्ष असो, तालुका अध्यक्ष असो की, सामान्य रोजगार सहाय्यक असो आपण सर्वांनी मतभेद विसरून ग्राम रोजगार सहायकाच्या मागण्या विषयी एकच पर्याय निवडावा तो म्हणजे 3 ऑक्टोंबर 2024 च्या शासन निर्णय लागू करण्यात यावा. त्या करता संपूर्ण महाराष्ट्रातील काम बंद आंदोलन करणे गरजेचे आहे. धन्यवाद.

21
911 views