
*सामाजिक जाणीव जपत यारी दोस्ती ग्रुप चे पालघर मध्य होत आहे कौतुक , ग्रुप च्या सदस्यांची योग्य वेळी होत आहे रुग्णांना मदत!!!!!
दिनांक, २५ ऑगस्ट २०२५ रोजी, पालघर येथील जया वाघारी या रूग्ण वेदांत हॉस्पिटल धुंदलवाडी येथे उपचार घेत असताना त्यांना तेचा शस्त्रक्रिया साठी o+ रक्ताची नितांत आवश्यकता भासत होती, सदर रक्त कुठेही उपलब्ध होत नव्हते म्हणून रक्तदाता मिळण्यासाठी यारी दोस्ती व्हॉट्सॲप ग्रुप वर मेसेज करण्यात आला. या रुग्णाला रक्तदान करण्यासाठी या ग्रुप मधील *सदस्य नरेश राऊत (सासवंद)* लगेचच तयार होवून त्यांनी वेदांत हॉस्पिटल येथे जावून रक्तदान करून त्या रुग्णाला रक्त दिले.
आजच्या या अँड्रॉइड युगात सोशल मीडियाचा गैरवापर वाढत असल्याचे दिसून येत आहे पण आज यारी दोस्ती ग्रुप पालघर हा सोशल मीडियाचा असा सामजिक कामासाठी, गरजू रुग्णांना रक्ताची नितांत आवश्यकता एका मेसेज वर या ग्रुप मधील सदस्य रक्तदान करण्यास तयार होत असतात. ही गोष्ट आजच्या काळात असामान्य म्हणण्यास काहीच हरकत नाही. आज हे रक्तदान करणारे सदस्यच खरे हिरो म्हणून बोलू शकतो, कारण ते दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचवत असतात.
या कार्याबद्दल यारी दोस्ती ग्रुप पालघर चे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे.