logo

आम्हाला कुणी न्याय देता का हो न्याय... राष्ट्रसंत कॉलनी देवरी येथील स्थानिक नागरिकांची हाक..

देवरीः- राष्ट्रसंत कालोनी देवरी येथील स्थानिक नागरिकांनी तहसिलदार यांचे कडे गणेश उत्सव साजरे करण्यासाठी ओपन स्पेस मध्ये परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला होता.                                                                                                                                                              ओपन स्पेस मध्ये भुमापन क्रं.३०९/०१/ब मध्ये आमचे सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी नियोजित आहे.त्या ओपन स्पेसच्या भुमापन क्र.३०९/०१/ब ही जागा ज्यांच्या नावावर आहे.त्या व्यक्तीचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर करण्यास कळविले आहे.संदर्भ क्र.०३ अन्वये नगरपंचायत कार्यालयाने सदर ओपन स्पेस लेआऊट धारक नागरीकांच्या उपयोगासाठी मोकळी करण्याचे आदेशीत केले आहे.                                 यांच्या पत्रावर तहसिलदार यांनी नामे भोजराज शामराव फुंडे राष्ट्रसंत कॉलोनी गणेश उत्सव मंडळ प्रभाग क्र.०१ देवरी यांचे नावाने १२/०८/२०२५ ला सार्वजनिक गणेश उत्सव कार्यक्रमाची भुमापन क्र.३०९/१/ब येथील ओपन स्पेस मध्ये गणेश उत्सव साजरा करावयाचा आहे त्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र सादर करण्याचे पत्र भोजराज शामराव फुंडे यांना देण्यात आले.                                                                              नगरपंचायत ला अर्ज देवुन त्यांच्या कडुन अर्जाची कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही.राष्ट्रसंत कालोनी देवरी येथील स्थानिक लोकांनी वारंवार नगरपंचायत ला जावुन ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी केली त्यांना कोणत्याच प्रकारचा पत्र न देता त्यांना टाळाटाळ करण्यात आली.त्यानंतर तेथील नागरिकांना  ना-हरकत प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे त्यांनी तहसिलदार,मुख्याधिकारी,पोलिस निरिक्षक यांना निवेदन दिले.          ओपन स्पेस जागेचा निर्णय लागत नाही तो पर्यंत कोणत्याच पक्षाला त्या ठिकाणी परवानगी देवु नये जर एका पक्षाला नाही व बाहेरिल लोकांना परवानगी देण्याचे काम नगरपंचायत करित  असेल तर चुकीच्या निर्यणामुळे वाद-विवाद झाल्यास राष्ट्रसंत कालोनी देवरी येथील स्थानिक ले आऊट धारक जबाबदार राहणार नाही.                                                                                                                                                       नगरपंचायत येथिल नगराध्यक्ष व नगर सेविका यांच्याशी चर्चा करण्यासाठी राष्ट्रसंत कालोनी देवरी येथील स्थानिक ले आऊट धारक नगरपंचायत ला गेले असता त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे चर्चा करायला तयार नाही नेमके कारण काय आहे या बदल आम्हाला माहीती द्या                  हे पण सांगायला तयार नाही.राष्ट्रसंत कालोनी देवरी येथील स्थानिक ले आऊट धारकांचे म्हणणे असे आहे की नगरपंचायत येथिल नगराध्यक्ष व नगर सेविका कुणाच्या दबावात तर नाही ना असा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

77
11137 views