logo

गडचिरोलीत ओबीसी, व्हीजेएनटी एसी आरक्षणासाठी शिवसेनेचे आंदोलन

गडचिरोली (२५ ऑगस्ट) – महाराष्ट्र शासनाने ओबीसी व्हीजेएनटी व एसी समाजाचे आरक्षण कमी करून ते मराठा समाजाला बहाल केल्याच्या निर्णयाविरोधात आज गडचिरोलीत शिवसेनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आले. गांधी चौक येथे झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख माननीय हेमंतभाऊ जंम्बेवारजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या वेळी ग्रामीण व शहरी भागातील शेकडो शिवसैनिक, महिला-पुरुष पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनात महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्रीदेवी वरघंटिवार, युवासेना प्रमुख दिपकभाऊ बारसागडे, जिल्हा संघटिका प्रमुख सौ. पौर्णिमा ईस्टाम, उपजिल्हाप्रमुख अविनाश वरघंटिवार, जिल्हा उपप्रमुख ईश्वरजी तिवाडे ओबीसी व्हीजेएनटी, जिल्हा सचिव ओबीसी व्हीजेएनटी निलकंठजी संदोकर, कृष्णा वाघाडे प्रसिद्धी प्रमुख शिवसेना, रामकृष्णजी बोरूले ओबीसी व्हीजेएनटी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, गडचिरोली तालुकाप्रमुख वसंजी गावतुरे,
धानोरा तालुकाप्रमुख निलकंठजी येरमे, बाळकृष्ण बोरकुटे गडचिरोली तालुकाप्रमुख ओबीसी व्हीजेएनटी, सौ. सुक्षमा पाटील, सौ. सुमित्रा टेकाम, सौ. उषाताई ढोके, सौ. हेमलता टिंगुसले, सौ. मनिषा सिडाम, सौ. ललिता राहाटे, सौ. शितलताई बनसोड, कार्यकर्ते देविदासजी आखाडे, जीवनजी चुधरी, ज्येष्ठ कार्यकर्ते माधवजी निकुरे,
कृष्णाजी लोणबले, पिपरे भाऊ, प्रफुल लोणारे, नेपाल मायमवार सचिन गेडाम, नागेश मेश्राम, विकास गेडाम, आकाश गेडाम, मयूर गेडाम, बंडू गेडाम, विलास गेडाम, किशोर गेडाम, वैभव लोणारे आदींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

या आंदोलनात बोलताना माननीय हेमंतभाऊ जंम्बेवारजी यांनी शासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा निर्णय तात्काळ रद्द करून ओबीसी व व्हीजेएनटी समाजाला पूर्ववत आरक्षण लागू करावे, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.

नंतर शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे निवेदनही सादर करण्यात आले.

81
1738 views