logo

आदिवासी परिषदेचा उखळी आश्रम शाळेविरोधात दणका मान्यता रद्द करण्याची मागणी


नागपूर |
जिल्हा प्रतिनिधी चंदू मडावी

मिळालेल्या माहितीनुसार
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नागपूर तर्फे हिंगणा तालुक्यातील उखळी येथील अहिल्यादेवी होळकर अनुसूचित आदिवासी आश्रमशाळा याविरोधात गंभीर तक्रारींसह निवेदन प्रशासनाकडे सादर करण्यात आले.

या निवेदनात परिषदेने शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत असल्याचे निदर्शनास आणले आहे. पोषण आहारात भेसळ, विद्यार्थ्यांना मारहाण व शिविगाळ, सुरक्षा अभाव, तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा घसरलेला दर्जा या गंभीर बाबींचा उल्लेख करण्यात आला. शाळा समितीकडून कोणताही गांभीर्यपूर्ण प्रयत्न होत नसल्याचेही परिषदेने स्पष्ट केले.

निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले की —
• विद्यार्थ्यांना रात्री ११ वाजेपर्यंत गावात विनामुंह फिरण्याची परवानगी असल्याने सुरक्षा धोक्यात आहे.
• बाहेरील व इतर राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून, कागदावर दाखवलेली विद्यार्थी संख्या व प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थी यामध्ये मोठा फरक आहे.
• शाळेची इमारत ढासळलेली असून, विद्यार्थ्यांच्या जीवितास सतत धोका निर्माण झाला आहे.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेनं शासनाला मागणी केली आहे की, तात्काळ चौकशी समिती स्थापन करून या शाळेविरुद्ध कठोर कारवाई करावी आणि संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी. तसेच या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार शाळांमध्ये त्वरित स्थलांतरित करण्याची मागणीही परिषदेतर्फे करण्यात आली आहे.

या संदर्भात परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोद दादा मसराम, विदर्भ अध्यक्ष संतोष दादा आत्राम, नागपूर विद्यापीठ सिनेट सदस्य तथा विदर्भ परिषदेचे दिनेश दादा शेराम, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) शुभम परतेती,दुर्गेश मसराम नागपूर शहर अध्यक्ष,अजय कुंभारे,सुनेश कुलमते,गणेश बालवंशी, नयन गेडाम, प्रवीण कौरती, अमित भलावी, साहिल मडावी, विजय परतेकी तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

186
7226 views