logo

*घरफोडीच्या व साखर कारखान्यातील गन मेटल चोरी गुन्ह्यातील आरोपीला 15 लाख 82 हजार रुपयाच्या मुद्देमालासह अटक. 18 गुन्हे उघ

*घरफोडीच्या व साखर कारखान्यातील गन मेटल चोरी गुन्ह्यातील आरोपीला 15 लाख 82 हजार रुपयाच्या मुद्देमालासह अटक. 18 गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*

याबाबत थोडक्यात माहिती की, काही दिवसा पासून जिल्ह्यात रात्रीच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या. तसेच विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जनावर चोरी, साखर कारखान्यातील गनमेटल च्या वस्तू चोरीच्याही घटना घडल्या होत्या. त्यावरून विविध पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीता विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात होते.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी शेतकऱ्या च्या माला विरूद्ध होणारे गुन्हे कारखान्यातील चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्याकरिता आदेशित केले होते .पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे दोन पथके तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता.
सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना पथकाला रात्रीच्या वेळी चोरी करणाऱ्या, तसेच जनावर व साखर कारखान्यातील गनमेटल च्या वस्तू चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता पथकांनी मुरुड येथील बायपास रस्त्यावरील रेल्वे स्टेशन चौक परिसरात सापळा लावून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतल. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांने त्यांचे नाव

1) रमेश उद्धव चव्हाण, वय 26 वर्ष, राहणार राजेश नगर ढोकी, जि. धाराशिव.

2) शिवाजी लाला काळे, वय 45 वर्ष, राहणार वाटवडा ता.जि.धाराशिव सध्या राहणार राजेश नगर ढोकी, जि.धाराशिव .

असे असल्याचे सांगितले. त्याच्या कडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता सदर बॅगमध्ये 09 लाख 25 हजार रुपये रोख रक्कम मिळून आली. सदर रकमेबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या इतर साथीदारासह मिळून लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी घरा घुसून चोरी केली असून अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दी मधून शेळ्या, म्हैस तसेच साखर कारखान्यातील गन मेटल च्या वस्तू चोरल्याचे कबूल केले. व सदरची रक्कम ही विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जनावर व सोन्या-चांदीचे दागिने चोरून ते विकून त्यामधून मिळवलेली असल्याचे कबूल केले.
तसेच पोलीस ठाणे किल्लारी, भादा व नांदेड जिल्ह्यातील बारड येथील साखर कारखान्यामधील गन मेटल च्या वस्तू त्यांच्या अन्य साथीदारासह मिळून चोरी करून ते भंगार दुकानदार

3) मुक्तार मौला पठाण, वय 42 वर्ष, राहणार तुकाई नगर, मुरुड.

याला तसेच आणखीन एक बार्शी येथील भंगार खरेदी दुकानदाराला विक्री केल्याचे सांगितले आहे. त्यावरून वर नमूद मुरुड येथील दुकानदारा कडून 01 टन 07 किलोग्रॅम इतक्या वजनाचे अंदाजे 06 लाख 57 हजार 456 रुपये किमतीचे भंगार जप्त करण्यात आले आहे.
तसेच लातूर जिल्ह्यातील घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याच्या अभिलेखाचे पाहणी केली असता पोलीस ठाणे भादा हद्दीतील घरफोडी,जनावर चोरी, तसेच साखर कारखान्याच्या गन मेटल च्या वस्तू चोरीचे असे 03 गुन्हे, पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण, कासारशिरशी येथील प्रत्येकी 03 गुन्हे, पोलीस ठाणे चाकूर व देवणी येथील प्रत्येकी 02 गुन्हे तर पोलीस ठाणे अहमदपूर, उदगीर शहर, निलंगा, किल्लारी व नांदेड जिल्ह्यातील बारड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 01 असे एकूण 18 गुन्हे उघडकीस आले असून नमूद आरोपीकडून एकूण 15 लाख 82 हजार 456 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नमूद आरोपींनी त्यांच्या अन्य 12 साथीदारासह वर नमूद पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये चोरी करून त्यात चोरलेला मुद्देमाल विकून मिळवलेली त्यांच्या हिश्याला आलेली नमूद रक्कम जप्त करण्यात आली आहे.
नमूद गुन्हेगार हे धाराशिव जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना पुढील कार्यवाही करिता पोलीस ठाणे किल्लारी यांच्या ताब्यात देण्यात आले असून ते सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे. त्याच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्याच्या सोबतच्या साथीदारांचा तसेच भंगार खरेदी करणाऱ्यांचा दुकानदाराचा शोध पोलिस पथक घेत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे,सफौ. सर्जेराव जगताप, पोलीस अमलदार माधव बिलापट्टे, रामलिंग शिंदे, नवनाथ हासबे, राजेश कंचे,प्रदीप स्वामी, तुराब पठाण, गणेश साठे, मोहन सुरवसे, रियाज सौदागर, युवराज गिरी, अर्जुनसिंग राजपूत, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, महादेव शिंदे, गोविंद भोसले, शैलेश सुळे, हरी पतंगे,व्यंकटेश निटुरे, प्रदीप चोपणे, श्रीनिवास जांभळे, महिला पोलीस अमलदार अंजली गायकवाड यांनी केली आहे.

9
349 views