
सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू – वेळुक गावात हळहळ
जि. ठाणे (ता. मुरबाड) –
मुरबाड तालुक्यातील वेळुक गावात सर्पदंशामुळे एका महिलेला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
रविवार, दि. २५ मे २०२५ रोजी मध्यरात्री १:३० वाजता कै. सौ. यशोदा (ताराबाई) यशवंत वारघडे (वय ६५) या झोपेत असताना विषारी मण्यार सर्पाच्या दंशामुळे गंभीर जखमी झाल्या. त्यांनी तत्काळ पतींना माहिती दिली व कुटुंबीयांनी त्यांना शिरोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
प्राथमिक उपचारांत पाच एंटीव्हेनम इंजेक्शन देण्यात आले, परंतु स्थिती गंभीर असल्याने त्यांना टोकाकडे येथे हलविण्यात आले. तेथे पंधरा एंटीव्हेनम इंजेक्शन दिल्यानंतरही प्रकृती बिघडत गेल्याने पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला.
मात्र दुर्दैवाने, रुग्णवाहिकेत नेत असताना पहाटे ४:०० वाजता रायते गावाजवळच त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे वेळुक गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थ व नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
घटनेची माहिती मिळताच निसर्ग विज्ञान संस्थेचे कार्यकर्ते व सर्पमित्र श्री. प्रवीण भालेराव, श्री. अनिकेत अहिरे व श्री. वैभव कुलकर्णी यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
निसर्ग विज्ञान संस्था, डोंबिवली .
https://youtu.be/QMb3eV7RH8s?si=2rguFMlobqDrQRIO