logo

मानसिक आजाराने ग्रस्त महिलेची आत्महत्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा पुढाकार*

*मानसिक आजाराने ग्रस्त महिलेची आत्महत्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा पुढाकार*

अहेरी : तालुक्यातील मोसम येथील महिला मीराबाई दस्सा नैताम (वय ४५) या महिलेने काल गळफास घेऊन आत्महत्या केली.गेल्या काही काळापासून त्या मानसिक आजाराने त्रस्त होत्या.घटनेच्या वेळी त्यांचे आई-वडील जंगलात कामानिमित्त गेले होते. या संधीचा फायदा घेत घरातच त्यांनी गळफास घेतला.

ही दुर्दैवी घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मानसिक नैराश्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेनंतर काँग्रेसचे पदाधिकारी जगनाथ मडावी व श्रीनिवास राऊत यांनी तातडीने पुढाकार घेतला.त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजय कंकडालवार यांच्याशी संपर्क साधला.अजय कंकडालवार यांनी स्वखर्चाने चारचाकी वाहनाची व्यवस्था करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पोहचवण्याची जबाबदारी पार पाडली.

आज दिनांक २३ ऑगस्ट रोजी मृतदेहाचे शवविच्छेदन (PM) करण्यात आले.त्यावेळी स्वतःअजय कंकडालवार उपस्थित राहून संपूर्ण कार्यवाहीवर लक्ष ठेवले.शवविच्छेदनानंतर त्यांनी पुन्हा स्वखर्चाने चारचाकी वाहनाची सोय करून मृतदेह मूळगावी पाठवला.

या कार्यामुळे मृतकाच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून गावकऱ्यांनी काँग्रेसनेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मानवतावादी दृष्टिकोनाचे विशेष कौतुक व्यक्त केले आहे.

गावात या घटनेने हळहळ व्यक्त होत असली तरी संकटाच्या प्रसंगी दाखवलेल्या सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

4
324 views