logo

धाडसी पत्रकारितेचा सन्मान... छोटू कांबळे यांचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते गौरव !

१८ ऑगस्टच्या भीषण पुर प्रसंगी
छोटू कांबळे यांनी निभावले पत्रकारितेचे खरे कर्तव्य !

चिखली /सत्य कुटे :
मुसळधार पावसाने चिखली शहरात १८ ऑगस्ट रोजी भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, जीव धोक्यात घालून खरी परिस्थिती जनतेपर्यंत पोहोचवणारे पत्रकार छोटू कांबळे यांचा केंद्रीय आयुष राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आज दि. २३ ऑगस्ट रोजी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी याप्रसंगी पत्रकार छोटू कांबळे यांचा सत्कार केला.
रुद्रावतार घेतलेल्या पावसात शहराच्या कानाकोपऱ्यात फिरून केलेले थेट वार्तांकन हे पत्रकारितेच्या कर्तव्याचे उत्तम उदाहरण ठरले, असे मान्यवरांनी गौरवोद्गार काढले. कुठलाही व्यावसायिक हेतू न ठेवता, केवळ जनतेला खरी माहिती मिळावी या उद्देशाने केलेल्या त्यांच्या निस्वार्थी कार्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.
या प्रसंगी चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे, मुख्याधिकारी प्रशांत बिडकर, आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांचे वडील अंकुशराव पडघान पाटील, शिवसेना शहरप्रमुख विलास घोलप, भाजप नेते पंडितराव देशमुख, राष्ट्रवादी नेते शंतनु बोंद्रे, माजी नगरसेवक दीपक खरात, कैलास भालेकर, कपिल खेडेकर,तलाठी खेडेकर, बाळासाहेब वराडे, रोहित खेडेकर, रोहित घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.

14
1494 views