logo

जाहीर नोटीस

पुणे - तमाम लोकांस आमचे अशील १) श्रीमती पार्वतीबाई दगडु काळगणे, २) श्रीमती नंदा शंकर जोरी, सर्व रा. लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे यांचे सांगणेवरून व दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटीस देण्यात येते की, गाव मौजे घेव्हंडे, ता. मावळ, जि. पुणे येथील मिळकत सर्व्हे/गट नं. ७१ यांसी एकूण क्षेत्र ०८ हे ३८ आर यांसी आकार २० रु. ०० पैसे या मिळकतीबाबत आमचे अशिलांच्या वतीने दस्त नोंदविण्यासाठी व इतर कामकाजासाठी म्हणून १) श्री. अमृतलाल सिंग कौल, २) श्री. सतबिरसिंग इक्बालसिंग कौल, सर्व रा. बेलापुर, नवी मुंबई, ३) श्री. महेश पोपटराव भेगडे, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे, यांनी दि. ०४/०७/२०२५ रोजी मे. दुय्यम निबंधक मावळ पुणे यांचे कार्यालयात दस्त क्र. ९०६०/२०२५ अन्वये नोंदवून घेतलेले आहे. सदर मिळकतीच्या पार्वतीबाई दगडु काळगणे या एकमेव मालक असून त्यावर इतर कोणाचाही हक्क किंवा अधिकार नाही. लिहून घेणार व श्री. कैलास भिवा साठे, रा. लोणावळा, ता. मावळ, जि. पुणे यांनी आमचे अशिलांच्या अशिक्षीतपणाचा गैरफायदा घेऊन अनावश्यक कागदपत्रांवर आमच्या अशिलांच्या सह्या घेतल्या आहेत असे आमच्या अशिलांच्या निदर्शनास आलेले आहे. म्हणून आम्ही सदरचे कुलमुखत्यारपत्र रद्द करत आहोत. आमचे अशिल योग्य ती कायदेशीर कारवाई लिहून घेणार यांचे विरुध्द करणार आहेत तसेच सदर कुलमुखत्यारपत्र रद्द झाल्याची नोटीसही रुजू करणार आहेत. त्यामुळे सदर मिळकतीबाबत वर नमुद व्यक्तींबरोबर सदर कुलमुखत्यारपत्राच्या आधारे कोणीही कोणत्याही स्वरूपाचा व्यवहार करू नये. तसे झाल्यास ते बेकायदेशीर असुन आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही म्हणून जाहिर नोटीस प्रसिध्द केलेली आहे. याची नोंद घ्यावी.

13
1201 views