logo

चुरणी गावात पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला

चुरणी (ता. चिखलदरा , जि. अमरावती) | 22 ऑगस्ट 2025 — चुरणी गावात पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला. शेतीतील कष्टकरी मित्र असलेल्या बैलांचे पूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

बैलांना पारंपरिक पद्धतीने अंघोळ घालून फुलांची सजावट, रंगीबेरंगी कपडे, शोभेचे शिंग आणि घंटा बांधून त्यांची सजावट करण्यात आली होती. महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमास गावचे पोलिस पाटील श्री. गोकुल जी झाडखंडे, उपसरपंच श्री. आशीष एन. टाले, श्री. सुखदेव बी. आंबेडकर, तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला.

गावात बैलांची मिरवणूकही काढण्यात आली. मंदिर परिसरात ग्रामस्थांनी एकत्र येऊन पारंपरिक पोशाखात फोटोसेशन केले. यावेळी काही शेतकऱ्यांनी आपले अनुभव शेअर करत सांगितले की, "बैल पोळा हा सण केवळ परंपरा नाही, तर आमच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे."

18
1817 views