logo

आदिवासी भागात बैलपोळा उत्साहात साजरा 🌾

सुरगाणा l कृष्णा पवार:- सुरगाणा/त्र्यंबकेश्वर/पेठ परिसरातील आदिवासी भागात बैलपोळा पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकरी बांधवांनी आपल्या बैलांना सकाळी नदीकाठी नेऊन स्नान घालून स्वच्छता केली. त्यानंतर शिंगांना रंग, तेल व सजावट करून मोरपिसे, फुलमाळा व झुलीने बैलांना आकर्षक स्वरूप देण्यात आले.

गावोगावी सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशे, लेझीम, पारंपरिक नृत्य व गोंडली-भोंगड्याच्या सादरीकरणाने वातावरण दुमदुमून गेले. स्त्रियांनी बैलांची ओवाळणी करून त्यांना गोडधोड नैवेद्य दिला.

यावेळी शेतकरी एकमेकांना भेटून शुभेच्छा देत होते. काही ठिकाणी सामुदायिक जेवणाचे आयोजन करण्यात आले. भाकरी, पिठलं, भाजी, गावरान चिकन यांसारख्या पदार्थांची मेजवानी गावकऱ्यांनी घेतली.

बैलपोळ्याच्या निमित्ताने आदिवासी समाजात आनंदाचे, उत्साहाचे आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले. बैलांच्या पुजेमधून शेतकऱ्यांनी आपल्या कष्टकरी जीवनाचा आणि बैलांच्या श्रमांचा सन्मान केला.

1
490 views