logo

नवनिर्मित पथविक्रेता बाजाराला आ. पठाण यांनी दिली भेट पथविक्रेत्यांच्या जाणून घेतल्या समस्या : सोयीसुविधा पुरवण्या संदर्भात दिले आश्वासन


अकोला : खुले नाट्यगृह बाजूला असलेल्या नवनिर्मित हॉकर्स झोन / पथविक्रेता बाजाराला गुरुवारी आ. पठाण यांनी भेट दिली. यावेळी याठिकाणी स्थलांतरित झालेल्या हॉकर्स वर्गाशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. तर या ठिकाणी आणखीन ज्या मूलभूत सुविधांची गरज आहे त्या पुरवण्या संदर्भात आश्वासन सुद्धा आ. पठाण यांनी या भेटी दरम्यान दिले.

महानगर पालिकेच्या वतीने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना नुकतेच मनपाने खुले नाट्यगृह शेजारील नवनिर्मित पथविक्रेता बाजारात स्थलांतरित करण्यास सुरुवात केली. गुरुवारी आ. पठाण यांनी सदर पथ विक्रेता बाजाराला आकस्मिक भेट देत तेथील फेरीवाल्यांशी संवाद साधला. यावेळी सदर ठिकाणी कोणत्या सुविधांचा अभाव आहे याची माहिती त्याठिकाणी असलेल्या व्यवसायिकांशी जाणून घेत आवश्यक त्या सुविधा पुरवण्याबाबत आश्वासन दिले.

26
2239 views