logo

पर्यूषण पर्वात जैन मंदिरात आ. पठाण यांचा सत्कार सर्वधर्म समभावतेचा दिला संदेश


अकोला : जैन समाजाचा पवित्र महिना म्हणून पर्यूषण पर्व सध्या सुरू आहे. या पर्वात जैन समाज बांधव तप, ध्यान, अहिंसा आणि क्षमापणा या सूत्रांचे पालन करीत उपवास धारण करतात. या पर्वात गांधी रोडवरील जैन मंदिर संस्थान व समाज बांधवांनी पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांचा मंदिरात शाल, श्रीफळ व भगवान आदिनाथ जैन यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

सद्यस्थितीत जैन समाजाचा पवित्र महिना म्हणून पर्यूषण पर्व सुरू आहे. या पर्वात जैन समाज बांधवांच्या वतीने तप, ध्यान, अहिंसा आणि क्षमापणा या चतुसूत्रांचे पालन करून उपवास धारण केले जातात. या पर्वात जैन समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपासना करतात. शहरातील गांधी रोडवरील जैन मंदिरात या पर्वाच्या अनुषंगाने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांचा मंदिर प्रतिष्ठान आणि समाज बांधवांच्या वतीने गुरुवारी दुपारी शाल, श्रीफळ व भगवान आदिनाथ जैन यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संपूर्ण मंदिराची, या पर्यूषण पर्वाची माहिती मंदिर प्रतिष्ठानतर्फे आ. पठाण यांना देण्यात आली. यावेळी मंदिरात या पर्वा निमित्त आलेले महाराज परमपूज्य पन्यास परमहंस विजयजी महाराज यांनी आ. पठाण यांना आशीर्वाद दिला. याप्रसंगी राजेश शाह, मयूर शाह, भरत शाह, सतीश कोठारी, राजू भंडारी, अनूप खरारे, मनन शाह यांचे सह समाज बांधव उपस्थित होते.

36
1894 views