
शहरासह तालुक्यात मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे सुभाष देव्हडे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते यांचा पुढाकार
दिनांक 18/8/25 रोजी चिखली तालुक्यामध्ये ढगफुटी झाल्यामुळे चिखली परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये चिखली मधील सखल भाग पुराच्या वेडक्यामध्ये पुरते डुबले होते यामध्ये माळीपुरा तसेच बारभाई मोहल्ला तसेच राऊतवाडी कुंभारवाडा या सोबतच जामवंती नदीकाठी सर्वच शेतजमिनी तसेच तालुक्यातील गावांमध्ये पण पूर परिस्थिती निर्माण झाली होती यामध्ये तालुक्यामध्ये पण हजारो एकर शेती पुराने बाधित झाली होती यावेळी सर्व चिखलीकरांनी व राजकीय सामाजिक सर्व बांधवांनी यामध्ये दीपकजी खरात, विलासजी घोलप, छोटू जी कांबळे चिखली मध्ये माळीपुऱ्यामध्ये अनेक कार्यकर्ते संकटाच्या वेळेसधावून सर्वांची मदत केली आम्ही काहीजण कुंभारवाडा या भागात होतो या भागामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते तसेच एक दोन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यावेळी याही भागांमध्ये सर्वच राजकीय सामाजिक कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले अक्षरशा कमरे एवढे पाणी असल्यामुळे जवळपास दोन तासानंतर येथील पाणी पाऊस कमी झाल्यामुळे काही प्रमाणात कमी झाली त्यानंतर तेथून निघाल्यानंतर आम्ही राऊतवाडीकडे गेलो तिथेही शेलुद रोड पर्यंत पाणीचा नधी चाप्रवाह गावामध्ये आला होता 2006 नंतर चिखली मध्ये प्रथमच जवळपास 14 वर्षानंतर इतक्या प्रचंड प्रमाणे पूर परिस्थिती निर्माण झाली होती पुराचे पाणी असल्यामुळे आज 19 तारखेला या भागामध्ये गेल्यानंतर व तेथील रहिवाशांची चर्चा करून तेथील परिस्थिती घराघरांमध्ये जाऊन बघितली नगरपरिषद असेल तहसील ऑफिस असेल तलाठी मंडळ अधिकारी असेल यांचे सर्वेचे काम युद्धपातळीवर सुरू होते यामध्ये शेतीचे घराचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासन स्तरावर सुरू होते यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना त्यांना या भागामध्ये 2006, 2019, व 2025 तीन वेळ पूर परिस्थिती निर्माण झालेली होती आता शासनाने कायमस्वरूपी जामवंती नदीचे रुंदीकरण व खोलीकरण करून यावर तोडगा काढावा असे आम्ही सांगितले त्यानंतर तेथील काही महत्त्वाच्या समस्या मुख्याधिकारी नगरपरिषद चिखली व आरोग्य अधिकारी यांना सांगितल्या त्यामध्ये मृत असलेले प्राणी व परिसरामध्ये डासाची उत्पत्ती होऊ नये अशा ठिकाणी फवारणी करणे तसेच येथे असलेली सर्व टॉयलेट हे पाण्याने ब्लॉग झाले ही बाब आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिली व प्रशासनाला नगरपालिके कडे असलेले व्याक्युम मशीन च्या साह्याने हे सर्व टॉयलेट साफ करून देण्याची विनंती देखील केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ओबीसी सेल) जिल्हा अध्यक्ष तथा आधार सेना संघटनेचे अध्यक्ष सुभाष बबनराव देव्हडे, दीपक अंभोरे, शेख गफूर भाई, भगवान भाऊ निकाळजे, तुळशीराम भाऊ आंबोरे, सलीम शहा मंगेश अंभोरे तसेच अमोल ताकफळे यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.