
पुणे -आळंदी -20-08-2025.. इंद्रायणी नदीच्या पुरामुळे भक्त पुंडलिक मंदिर, आणि भक्ती सोपान पूल पाण्याखाली.
महाराष्ट्रात गेल्या चार-पाच दिवसापासून अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आलेला आहे, त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील मावळ व इतर धरण परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू असल्यामुळे इंद्रायणी नदीच्या पातळीत मोठी वाढ झालेली असल्यामुळे नदीला पुर आलेला आहे त्यामुळे इंद्रायणी नदीतील संत पुंडलिक महाराज यांचे मंदिर आणि भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेले आहेत, पोलीस प्रशासन, तसेच नगरपालिकेतील कर्मचारी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत
त्याचप्रमाणे शनी मंदिरातील परिसरातील दुकाने यांना सूचना देऊन बंद करण्यात आलेले आहेत,मावळात अतिवृष्टी झाल्यामुळे इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे त्याचप्रमाणे आळंदी येथील जुना पूल रहदारीसाठी बंद करण्यात आलेले आहे, चाकण चौकात एक वाहन बंद पडल्यामुळे ट्रॅफिक झाली होती याची तत्परता राखून चाकण चौकात तैनात असलेले पोलीस व महिला पोलीस अपर्णा तापकीर, संगीता भाकरे,लांडगे, रोहिणी, लांडे, वंदना गव्हाणे,नर्मदा मिलखे,यांनी बंद पडलेले वाहन ढकलून ट्राफिक पूर्ववत केले त्यांचे सगळीकडेच कौतुक होत आहे, इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे नागरिकांनी नदीच्या पात्रात उतरू नये तसेच इंद्रायणी नदीच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे,व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आळंदी नगर परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे
ब्युरोची चीफ - जे.के. सोनवणे