logo

विनोद पवार यांच्या मृत्यूस जबाबदार शासकीय कर्मचारी — विजयकांत गवई



जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ खुर्द येथील आंदोलक शेतकरी विनोद पवार यांनी गावकऱ्यांच्या मागणीसाठी निवेदन दिले होते 15 ऑगस्ट रोजी आंदोलन होणार हे शासकीय कर्मचाऱ्यांना माहित असून सुद्धा कोणी दाखल घेतली नाही विनोद पवार यांच्या मृत्यूस जबाबदार शासकीय कर्मचारी यांची तात्काळ चौकशी करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी चिखली तहसीलदार यांना निवेदन रिपब्लिकन सेनेच्या वतीने दिनांक 19 ऑगस्ट रोजी देण्यात आले. आडोळ खुर्द येथील आंदोलन शेतकरी विनोद पवार यांनी गावकऱ्यांच्या मागणीसाठी निवेदन दिले असता सदर निवेदनाची दखल न घेतल्याच्या कारणास्तव जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्याची वेळ आली होती 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन जलसमाधी होणार असल्याचे शासकीय कर्मचारी यांना माहीत असून सुद्धा कोणी दखल घेतली नाही यातच शासनाचा बेजबाबदारपणा दिसून येतोय आणि विनोद पवार यास आपला प्राण गमवावा लागला विनोद पवार यांनी नवीन गावठाण आडोळ खुर्द गावाच्या सुविधा या इतर गावापेक्षा खूप तफावत आहे रस्ते सुद्धा निकृष्ट दर्ज्याचे आहेत ठेकेदार व कर्मचारी यांच्या संगनमताने खूप मोठा भ्रष्टाचार करून रस्ते बनवण्याचा गावकऱ्यांचा आरोप होता तरी देखील शासन कधीच दखल घेत नाही या कारणास्तव 15 ऑगस्ट रोजी महिलांनी आपल्या लहान मुलांना घेऊन पूर्णा नदीपात्रात आंदोलन सुरू केले असता विनोद पवार यांनी सर्व समक्ष आमचे मरण्याची वाट पाहता का पोहता येत नाही शेवटचा निरोप घ्यावा असे बोलत त्यांनी पूर्णा नदीच्या पुराच्या पाण्यात उडी घेतली पूर्णा नदीपात्रात उडी घेऊन आपले जीवन कार्य संपवले आहे शासनाच्या या हलगर्जीपणामुळे व बेज जबाबदार कृतीमुळे एका निष्ठावान कार्यकर्ताचा जीव गेला आहे तरी याची सखोल चौकशी करून ठेकेदार व शासकीय कर्मचारी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयकांत गवई यांनी निवेदनामध्ये दिला. निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्मा साळवे, जिल्हा महासचिव शेख सलीम, कामगार जिल्हाध्यक्ष सुरेश इंगळे, शहर उपाध्यक्ष सतीश पवार, सौरभ बावस्कर, विकी निकाळजे हे होते.

40
6334 views