
अंतुर्ली येथे मुख्य रस्त्यावर दुभाजकाची आवश्यकता वाहनचालक व ग्रामस्थांची मागणी*
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे गावातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर दुभाजक बसवणे अत्यंत गरजेचे आहे अंतुर्ली गावात प्रवेश करण्यासाठी मुख्य रस्त्याने वाहन चालकास फार कसरत करावी लागते एकाच वेळेला दोन वाहने पास होताना फार अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यात रस्त्याचे तीन तेरा वाजले आहे रस्ता खराब असो वा चांगला वाहनांमध्ये ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेत अनेक वेळा अपघात पण झालेले आहे.या मुख्य रस्त्यात लहान मुलांची जिल्हा परिषद शाळा,विद्यालय,जुनिअर कॉलेज, सोसायटी,पोलीस स्टेशन, सब स्टेशन ,हनुमान मंदिर आहे. सकाळी जड वाहने रस्त्याने येतात वाहनांची नेहमी वर्दळ असते त्यामुळे लहान मुलांना शाळेत जाण्यास फार अडचणी येतात .अशाने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून विवा पेट्रोल पंप ते कृषी सेवा केंद्र पेट्रोल पंप पर्यंत दुभाजक बसवणे अत्यंत गरजेचे आहे. असे वाहन चालकाकडून व ग्रामस्थांनकडून बोलले जात आहे कारण या मुख्य रस्त्यावर जिल्हा परिषद शाळा ,हायस्कूल, पोलीस स्टेशन , सब स्टेशन, सोसायटी पुढे मारुतीचे मंदिर पण आहे येथे खूप मोठी गर्दी असते .भविष्यात अपघाताची घटना टाळण्यासाठी रस्त्यावर दुभाजक बसवणे अत्यंत गरजेचे आहे मुख्य रस्त्यावर दुभाजक बसवावे अशी वाहनचालकान कडून व ग्रामस्थांकडून मागणी होत आहे .रात्रीच्या वेळेत लख्ख प्रकाशामुळे नजरेत पळत नाही त्यामुळे या रस्त्यावर अनेक वेळा अपघात झालेले आहे रस्ता विकास महामंडळाने लक्ष देत रस्त्यावर दुभाजक बसवण्याची गरज व्यक्त होत आहे .रस्त्यावर दुभाजकाची गरज आहे कारण विरुद्ध दिशेने येणारी वाहने एकमेकांवर धडकण्याची शक्यता कमी असते त्यामुळे होणारे अपघात टाळता येतील. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा प्रवाह नियोजित करते पादचाऱ्यांचा सुरक्षितेसाठी आवश्यक आहे त्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित जागा मिळणे मदत होईल ज्यामुळे रस्त्यावरील धोके कमी होतील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे येणारी कोंडी कमी करण्यास मदत मिळेल थोडक्यात रस्त्यावर दुभाजक बसवणे हे वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक घटक आहे .म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष द्यावे.असे वाहन चालकांकडून व ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.