logo

मुक्ताईनगर येथे भव्य कावड यात्रा व भजन गायिका शहनाज अख्तर यांचा गायनाचा कार्यक्रम संपन्न*

मुक्ताईनगर शहरात भव्य महाकावड यात्रेचे आयोजन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले . शहरात ठीक-ठिकाणी कावड यात्रेच्या स्वागतासाठी डिजिटल बॅनर व भगवे ध्वज लावून सजावट करण्यात आली होती. कावड यात्रेला प्रारंभ संत मुक्ताई मुळ मंदिर कोथळी येथून दुपारी 02:00 वाजता झाला कावड यात्रेची समाप्ती सायंकाळी 7 वाजता नागेश्वर मंदिर जुने गाव येथे झाली. कावड यात्रेची समाप्ती झाल्यानंतर सायंकाळी 7 वाजता प्रवर्तन चौकातील शिवसृष्टी समोर सुप्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. या कावड यात्रेमध्ये प्रमुख आकर्षण डीजे, लाईट शो, अघोरी टीम आणि महाकाल ढोल पथक हे होते. या कावड यात्रेत जास्तीत जास्त संख्येने मुक्ताईनगर तालुक्यातील व परिसरातील नागरिक उपस्थित होते. या कावड यात्रेचे व भजन गायिका शहनाज अख्तर यांच्या कार्यकमाचे आयोजन मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील व मुक्ताईनगर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते.

0
824 views