logo

ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनतर्फे स्वातंत्र्यदिनाचा उत्साहाने साजरा

ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनतर्फे स्वातंत्र्यदिनाचा उत्साहाने साजरा
पुणे: उमेश पाटील 8530664576
पिंपळे गुरव (पिंपरी चिंचवड) – ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी पशूसंवर्धन महाराष्ट्र राज्याच्या मा.डॉ यशोधरा नितनवरे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.
ध्वजारोहणानंतर संस्थेचे अध्यक्ष कैलास गहिनीनाथ बन्सोडे यांनी स्वातंत्र्य दिनाचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करताना स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचे स्मरण केले. “आजची पिढी ही स्वातंत्र्याची खरी वारसदार असून समाजहितासाठी निःस्वार्थीपणे कार्य करणे हेच स्वातंत्र्याचे खरे मूल्य आहे,” असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, महिला मंडळ, युवकवर्ग तसेच लहान मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राष्ट्रगीताच्या सामूहिक गजराने परिसर देशभक्तीच्या भावना व्यक्त करणारा झाला.
कार्यक्रमाचे संयोजन संस्थेच्या महेंद्र गजभिये,आगंदा चव्हाण,सत्यवान मोरे,जयवर्धन कांबळे,रीतेश बाराथे,पोपट केंजळे,सुरेखा बनसोडे,प्रमिला इनामदार,शितल गायकवाड,नूतन सोनवणे,नेहा क्षीरसागर,विद्या कांबळे,वैशाली कांबळे,जयश्री कांबळे,प्रतिभा मोरे,आशा चव्हाण,सुजाता निकाळजे,या सर्व पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले. शेवटी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानून सोहळ्याची सांगता करण्यात आली.

19
266 views