करकंब मध्ये "शिवधर्म संघटना, महाराष्ट्र राज्य" ची स्थापना - सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढाई उभारणार..
श्री. पांडुरंग काटवटे, सोलापूर (प्रतिनिधी) :- करकंब ता पंढरपूर येथे सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढा उभारून न्याय मिळवून देण्याचा उद्देशाने "शिवधर्म संघटना, महाराष्ट्र राज्य" ची स्थापना आज करण्यात आली आहे. शिवधर्म संघटना म्हणजेच शिवधर्माचे पालन करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या मूल्यांचे पालन करून एक चांगला माणूस आणि एक चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न करणे यासाठी ही संघटना कार्य करणार आहे. आज करकंब येथील 11 जिवंत समाधी असलेल्या समाधी स्थळांना पुष्पहार अर्पण करून गावातून मोटर सायकल रॅली काढण्यात आली.या मार्गे काढण्यात आली बाईक रॅली १.कनकंबा मंदिर २.श्री.पानसरे महाराज.(विठ्ठल मंदिराजवळ)३.पारलिंग जंगम स्वामी महाराज ( काळा मारुती जवळ )४.श्री.सद्गुरू भाजलिंग महाराज५.बापूजी बुवा महाराज६. द्वारकोजी महाराज ७. श्री सद्गुरू ब्रह्मानंद महाराज बैरागी ८. भाऊसाहेब सोनार महाराज (बस स्टॅन्ड) ९. श्री दानोजी बुवा महाराज ( बस स्टॅन्ड) १०. श्री सद्गुरू रेवालिंग्या जंगम महाराज ( गणेश टेकडी)११.माणिक प्रभू देशपांडे महाराज ( नावे गल्ली) १२. श्री सद्गुरू महा बुद्धा जंगम महाराज ( महादेव गल्ली शुक्रवार पेठ)उद्दिष्टे :–- समाजामध्ये सर्वसामान्य लोकांवर होणाऱ्या अन्याय विरुद्ध लढण्यासाठी..- समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच महिला आणि भगिनीच्या संरक्षणासाठी..- परिसरातील प्रत्येक व्यक्तीचा सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्या विकास करणे .- सर्वांसाठी समान संधी आणि न्याय सुनिश्चित करणे. - सांस्कृतिक आणि कलात्मक कार्यांना प्रोत्साहन देणे.- सामाजिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सरकार आणि इतर संबंधित घटकांवर दबाव आणणे. - समुदायाला एकत्र आणणे आणि त्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे. - सर्वसामान्य लोकांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना सामाजिक न्याय मिळवून देणे.