logo

नाशिक मधील ब्लॉसम अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव साजरा

प्रतिनिधी १८ ऑगस्ट (नाशिक) :- नाशिक मधील ब्लॉसम अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडीसाठी नर्सरी पासून पुढील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आज सकाळी शाळेच्या वेळेमध्ये हा दहीहंडी उत्सव पार पडला.

दहीहंडी उत्सवासाठी सर्व विद्यार्थी रंगीबेरंगी पोशाख परिधान करून आले होते. काही विद्यार्थी श्रीकृष्णाचा पोशाख परिधान करून आले होते तर काही विद्यार्थिनी राधाचा पोशाख परिधान करून आल्या होत्या. शाळेच्या प्रांगणामध्ये भव्य अशी दहीहंडी बांधून उत्सव साजरा करण्यात आला. लहान वर्गातील विद्यार्थ्यांची दहीहंडी वेगळी फोडण्यात आली आणि मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांची दहीहंडी वेगळी पडण्यात आली. दहीहंडीची गाणी लावण्यात आली होती या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य करत दहीहंडीचा आनंद साजरा केला.

दहीहंडी निमित्त शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी प्रसाद बनवला होता. सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या दहीहंडी उत्सवाचा आनंद विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी घेतला. दहीहंडी उत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. एकूणच शाळेतील वातावरण आनंदमय झाले होते.

57
2331 views