
चैतन्य चॅरिटेबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. लक्ष्मीकांत भानुदास वाघमारे यांना राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान आयुष मंत्रालय,भारत सरकार,पुणे यांच्यावतीने गांधी फेलोशीप प्रदान करण्यात आली.
डॉ. लक्ष्मीकांत वाघमारे यांना फेलोशिप प्रदान (शिवाजी श्रीमंगले) विशेष प्रतिनिधी शिरूर ताजबंद :- येथील चैतन्य चॅरिटेबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. लक्ष्मीकांत भानुदास वाघमारे यांना राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान आयुष मंत्रालय,भारत सरकार,पुणे यांच्यावतीने गांधी फेलोशीप प्रदान करण्यात आली. डॉ. वाघमारे यांनी " हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह प्रकार दोन सारख्या असंसर्गजन्य आजारांच्या उपचारात विशिष्ट योग आणि निसर्गोपचार उपायांचा अभ्यास " हे संशोधन यशस्वीरित्या पूर्ण केले. डॉ. वाघमारे हे सन १९९८ पासून शिरूर ताजबंद परिसरात रुग्णसेवेत आहेत, त्यांनी योग निसर्गोपचाराची अनेक मोफत शिबिरे परिसरात घेतली आहेत या यशाबद्दल मा.नामदार श्री बाबासाहेब पाटील मंत्री महाराष्ट्र राज्य, आयुष मंत्रालयाचे सदस्य व आय.एन.ओ.चे अध्यक्ष डॉ.अनंत बिरादार नवी दिल्ली ,डॉ. नारायण जाधव अध्यक्ष एम.ए.आर.बोर्ड (एन.सी.आय.एस.एम.भारत सरकार नवी दिल्ली),डॉ.सत्यलक्ष्मी संचालक एन.आय.एन.पुणे, गांधी संशोधन विभाग प्रमुख डॉ. नैना अठल्ये, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. सुधीर बनशेळकीकर , डॉ. मधुसूदन चेरेकर,डॉ. मालसमीन्दर एस.एल.,आर.एम.एस.एस. महामंत्री डॉ. शरदकुमार तेलगाने, डॉ. नवनाथ वाघमारे, डॉ. विठ्ठल मरवाळे,सामाजिक कार्यकर्ते राजकुमार बलदवा, डॉक्टर्स असोसिएशन शिरूर ताजबंद व मित्रपरिवारांनी त्यांचे अभिनंदन केले.