
15 ऑगस्ट रोजी भारत देशाच्या 79 व्या स्वतंत्र दिनानिमित्त शेलारवस्ती,चिखली पुणे येथे GACIC आणि GEM मार्फत संस्थापक डॉ.अनिश विजागत आणि सौ.ज्युलिया विजागत यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या भारत देशाच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण
दिनांक 15 ऑगस्ट रोजी भारत देशाच्या 79 व्या स्वतंत्र दिनानिमित्त शेलारवस्ती,चिखली पुणे येथे GACIC आणि GEM मार्फत संस्थापक डॉ.अनिश विजागत आणि सौ.ज्युलिया विजागत यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या भारत देशाच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून पुढील कार्यक्रम पार पाडण्यात आला यात ग्लोरीयस ग्लोबल सोशल फाउंडेशनचे भव्य उद्घाटन पार पाडण्यात आले यामध्ये ग्लोरिअस वृद्धाश्रम,अनाथाश्रम,अंधाश्रम, कुष्ठरोग केंद्राचे उद्घाटन करण्यात आणि ग्लोरियस बिझनेस फाउंडेशनच्या २१ प्रकारच्या नवीनतम प्रगतशील व्यवसायांचे उद्घाटन झाले,याच अनुषंगाने अनेक विशेष मान्यवर देखील उपस्थित राहिले त्यामध्ये मा.सौ.प्रफुल्ला मोतलिंग (महिला अध्यक्षाःमाहिती अधिकार पुणे,भारत राष्ट्र समिती,महाराष्ट्र राज्य),मा. श्री.वाजिद सय्यद (प्रदेशाध्यक्ष महाराष्ट अल्पसंख्याक विभाग),श्री.कुंदन गायकवाड (नगरसेवक पिं.चिं.मनपा),मा.श्री.संदीपभाऊ शेलार (अध्यक्ष- ब्रह्मा विष्णू महेश कब्बडी संघ), श्री.यश दत्तकाका साने(युवा नेते,अध्यक्ष - दत्ता काका साने प्रतिष्ठान),ॲड.अँजेलिना पाटील, मा श्री.प्रशांत इलकल सर (प्रसिद्ध उद्योजक, GGSF, सामाजिक कार्यकर्ते), मा.श्री.शिवाजी बिटके सर (बिल्डर, उद्योजक), आसिफ भाई शेख (जनसेवक), सचिन बडारिया (जनसेवक) श्री.मा सचिन पलांडे (कोकण प्रांत अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेत जर्मन टेक्नॉलॉजीच्या यंत्राद्वारे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर पार पाडण्यात आले यामध्ये अनेक लोकांनी सहभागी होऊन सर्व सुविधांचा भरपूर लाभ घेतला.
ग्लोरिअस ग्लोबल सोशल फाऊंडेशनच्या वतीने "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या ब्रीदवाक्यानुसार १०० अप्रतिम प्रतीच्या झाडांचे वृक्षारोपण देखील करण्यात आले आणि तसेच आंतरराष्ट्रीय मानव अधिकार परिषद या वृत्तवाहिनीचे उद्घाटन करून नवीन वृत्त पत्रकारांची नियुक्ती करण्यात आली.
या संपूर्ण कार्यक्रमाची आणि उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी ग्लोरिअस कोअर कमिटी व सिनेट बोर्डचे सदस्य उपस्थित राहिले.