अखेर "स्पर्श"वर कारवाई..ऑटो क्लस्टर डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह पालिकेने केले अधिग्रहीत
पुणे :येथील चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्लस्टर मधील कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेण्यासाठी पैसे घेणे, रेमडेसिविर इंजेक्शन ची खुल्या बाजारात विक्री करणे,यावरून हॉस्पिटल संचलन करणारी फॉर्चून स्पर्श हेल्थ केअर ही संस्था , रुग्णांना मोफत वैद्यकीय , समधान कारक सेवा देण्यात कुचकामी ठरली आहे. करार भंग, मानवतेला काळीमा फासणारे कृत्य, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण करण्यात अपयशी ठरली आहे.या सर्व बाबींचा ठपका ठेवत,स्पर्श चालवत असलेले हॉस्पिटल, कर्मचाऱ्यांसह पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आजपासून अधिग्रहीत केले आहे. तसेच"स्पर्श"ल काळया यादीत का टाकू नये? फौजदारी कारवाई का करू नये?अश्या आशयाची कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे, तसेच चार दिवसात खुलासा करा असे सांगितले आहे.