logo

भारत सर्व सेवा संघ सेवकांची सहकारी पतसंस्थेची ५६ वी वार्षिक सभा खेळीमेळीत

भारत सर्व सेवा संघ सेवकांची सहकारी पतसंस्थेची ५६ वी वार्षिक सभा खेळीमेळीत


नेवासा तालुका -
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे रविवार दिनांक १७/८/२०२५ रोजी भारत सर्व सेवा संघ सेवकांची सहकारी पतसंस्थेची ५६ वी वार्षिक सर्व साधारण सभा मोठ्या खेळीमेळीत पार पडली. संस्थेच्या कै.सिताराम पाटील तुवर सभागृह पाचेगाव येथे सभा संपन्न झाली.
यावेळी संस्था प्रतिनिधी मा. श्री डॉ.अशोकजी पाटील तुवरसर यांनी संस्थेस मार्गदर्शन केले.

सभा सुरू होण्यापूर्वी शाहिद जवान,सभासद यांचे नातेवाईक कोणी मयत झाले असतील अशांना संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिन्यात आली.सभेचा कोरम पूर्ण झाल्याने सभेस सुरुवात झाली.

सभेची प्रस्तावना संस्थेचे संचालक श्री पालवे सर यांनी केले.अध्यक्षीय निवड सुचना खटाणे सर,त्यांना अनुमोदन संस्थेचे संचालक श्री मतकर सर यांनी केले.संस्थेच्या विकासाच्या दृष्टीने चर्चा झाल्या.सभासद मधून श्री जाधव सुभाष सर, तूवर योगेश सर तसेच संचालक मधून श्री जंगले राजेंद्र दगडू यांची भाषणे झाली.संस्थेचे सभेचे विषयाचे वाचन संस्थेचे सचिव श्री निरंजन होन पाटील यांनी केले.प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शन नंतर अध्यक्षीय भाषण संस्थेचे चेअरमन श्री पवार भगवान शिवाजी यांनी केले.

सभेचे सर्व विषय मंजूर करण्यात आले.त्यानंतर अध्यक्षीय परवानगीने सभेचे कामकाज पूर्ण करण्यात आले.यावेळी सन्माननीय आजी माजी संचालक, जेष्ठ सभासद ,सभासद,सेवानिवृत्त सभासद उपस्थित होते.

67
2709 views