logo

"लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय बुलडाणा तर्फे जनतेस आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा."

मन्सूर शहा.AIMA MEDIA:----दिनांक १६.०८.२०२५ रोजी पासुन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय बुलडाणा तर्फे जनतेस आवाहन करण्यात येते की, जनतेमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्याचे उद्देशाने भ्रष्टाचारासंबधी माहीती असल्यास अगर लाच मागणा-या शासकीय अधिकारी व कर्मचारी लोकसेवकांबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी त्वरीत संपर्क होणेकरीता नविन मोबाईल/व्हाट्स अॅप क्रमांक ९४०५०९१०६४ सुरु करण्यात आला आहे. तरी लाच मागणा-या शासकीय अधिकारी व कर्मचारी लोकसेवकांबद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधरत विभागाच्या कार्यालयाशी त्वरीत संपक साधावा. कोणाविरुध्द तक्रार करता येते- महसुल विभाग, नगर परिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग, विद्युत महामंडळ, व्यवसायकर विभाग, विकीकर विभाग, नगर रचना विभाग, जिल्हा उपनिबंधक विभाग, दुय्यम निबंधक व उपनिबंधक विभाग, कोषागार विभाग, सहकारी पतसंस्था राज्य परिवहन महामंडळ, उपप्रादेशिक परिवहन विभाग, शासनाकडुन अनुदान मिळणा-या सर्व संस्था व
शैक्षणिक संस्था सर्व शासकीय कार्यालय तसेच अन्य सर्व महामंडळे येथील सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी तसेच सरकारी नोकरांसाठी लाच मागणारे सर्व एजंट/मध्यस्थ. बे-हिशोबी संपत्ती भ्रष्टाचारच्या मार्गाने अधिकारी, कर्मचारी यांनी बेहिशोबी संपत्ती जमविल्याबाबत तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिल्यानंतर त्यातील सत्यता व विश्वासर्हता पडताळल्यानंतर कार्यवाही करण्यात येते, तक्रार कर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते. पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रबिंधक विभाग, बुलडाणाकार्यालयीन दुरध्वनी कमांक ०७२६२-२४२५४८हेल्पलाईन क्रमांक १०६४मो.नं. ९४०५०९१०६४उपअधिक्षक अन् (भागोजी चोरमले ) पोलीस उप अधिक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा.


18
808 views