
जेवळी ता लोहारा जिल्हा धाराशिव येथील भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक आणि लिगायत समाजावर जेवळी येथील ग्रामपंचायत अधिकारी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक प्रशाशन मार्फत घोर अन्याय
प्रति दि.17/08/2025
माननीय
श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,
मी श्री महादेव बाबु शिंदे रा जेवळी ता लोहारा जिल्हा धाराशिव ,(भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक) आपणास कळवू इच्छितो की, भूकंपग्रस्त जेवळी ता लोहारा जिल्हा धाराशिव हे गाव असून येथे लिगायत दफनभूमी च्या जागेवर महाडा तर्फे वृक्ष लागवड करण्यात आली आहे ,
हीच जागा गाव पुर्नवसन नंतर लिगायत समाजासाठी वापरली जात आहे,सन 2022 पासून संबधीत कागदपत्रे आधारे ही जागा दफनभूमीस देण्यात यावी,या साठी सातत्याने मागणी करण्यात आली आहे त्या काळातील पालकमंत्री श्री तानाजी सावंत तसेच जिल्हाधिकारी,तहसीलदार लोहारा धाराशिव आणि ग्रामसेवक जगदाळे साहेब याच्याशी या बाबत चर्चा व पाठपुरावा देखील सतत झाला होता तरी ही अद्याप प्रशाशनाने कोणतेही ठोस कार्यवाही केलेली नाही उलट या दफनभूमी वर अतिक्रमण झाले आहे, त्या विरोधात श्री दफनभूमी या ठिकाणी श्री श्यामसुंदर (राजू) तोरकडे साहेब यांनी 1/08/2025 पासून अन्यत्याग करून आमरण उपोषण ला प्रारंब केला आहे, आज एकूण 17 दिवस झाले तरी परुंतु उपोषण कर्त्याचे ताब्येत तीन दिवसांपासून अत्यन्त खराब झाली आहे तरी ही कोणते ही प्रशाशन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे,
विशेष म्हणजे ग्रामसभेत देखील 500 जनतेसमोर चर्चा झाल्यावर बहुमताने ठराव पास झाला असून ही सरपंच ग्रामसेवक अनो स्थानिक प्रशाशन जेवळी येथील जनतेला आणि उपोषण कर्त्याला न्याय न देता उलट आंदोलन कर्त्यासह त्याच्या फॅमिली नातेवाईक असे एकूण सहा जनावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले त्या मुळे ग्रामस्थांन मंध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे म्हणून सर्व भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक याच्या वतीने प्रशाशन ला नम्र विनंती करीत आहे
टीप:- 1) दफनभूमी वरील अतिक्रमण तात्काळ हटवावे
2) जागा अधिकृतपणे लिगायत समाजास सुपूर्द करावी
3) अंदोलनकर्त्यावर झालेले अन्यायकारक गुन्हेगारी कार्यवाही मागे घ्यावी
4) त्या दफनभूमी ला कायमस्वरूपी लिगायत दफनभूमी असे नाव देण्यास परवानगी द्यावी
कळवा
आपले नम्र
भूमिहीन शेतमजूर झोपडपट्टी धारक च्या वतीने
श्री महादेव बाबु शिंदे
जेवळी ता लोहारा जिल्हा धाराशिव
मो न 8369365260