logo

शिवछत्रपती तरुण मंडळ श्रीपूर सेक्शन नऊ या मंडळाने स्वखर्चाने स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पुल तयार करून गैरसोय टाळली*




*श्रीपूर*


श्रीपूर येथील स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावरच नीरा उजवा कालवा फाट्यावर एक लहान पुल होता तो पुल धोकादायक व कठडे तुटून लोखंडी रॉड बाहेर आले होते त्यामुळे रात्री अपरात्री अंत्यसंस्कार करण्यासाठी जाताना धोकादायक आहे जावे लागत होते या बाबत महाळुंग श्रीपूर नगरपंचायत कडे गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा व पुल दुरुस्त करण्यासाठी मागणी केली जात होती पण नगरपंचायत कसलीही दाद देत नव्हती गेल्या आठवड्यात श्रीपूर मध्ये तीन ते चार व्यक्तींचे दुःखद निधन झाले अंत्यसंस्कार करण्यासाठी सरपण घेऊन जाण्यास वहान तुटलेल्या धोकादायक पुलावरून जाण्यास अडथळा निर्माण झाला तेव्हा येथील तरुणांनी अक्षरशः दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावर खांद्यावर लाकडे घेऊन स्मशानभूमीत नेली नगरपंचायत काही दखल घेत नाही हे पाहून श्रीपूर नऊ सेक्शन येथील श्री शिवछत्रपती तरुण मंडळाने स्वखर्चाने आज सकाळी तुटलेला पुल दुरुस्त करून गैरसोय टाळली आहे जेसीबी ने तुटलेला व लोखंडी रॉड बाहेर आलेला भाग बाहेर काढून खडी मोठी दगड व मुरुम आणून संपूर्ण पुल मजबूत केला आहे तसेच स्मशानभूमीत रस्त्यावर अस्ताव्यस्त असणारी झाडाझुडुपांतील वेली गवत काढून स्वच्छता केली आहे याचं शिवछत्रपती तरुण मंडळाने गेल्या वर्षी या स्मशानभूमी मध्ये स्वच्छता अभियान राबवून स्मशानभूमी स्वच्छ केली होती संपूर्ण स्मशानभूमीची स्वच्छता साफसफाई करून अस्ताव्यस्त पडलेले मयताचे साहित्य अर्धवट जळालेली लाकडे बांबू व इतर टाकाऊ वस्तू तेथून उचलून त्यांची विल्हेवाट लावली होती शिवछत्रपती तरुण मंडळाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक झाले होते आजही स्मशानभूमी येथे जाण्यासाठी धोकादायक असलेल्या पुलाचे काम स्वखर्चाने करून या मंडळाने गावापुढे आदर्श ठेवला आहे विशेष म्हणजे स्मशानभूमी येथील गैरसोय अस्वच्छता धोकादायक पुल या संदर्भात स्थानिक एकाही नगरसेवकाने लक्ष दिले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे शिवछत्रपती तरुण मंडळाने नगरपंचायतला व अधिकाऱ्यांना नेत्यांना लाजवले आहे अशी चर्चा आज श्रीपूर पंचक्रोशीतील नागरिक करत आहेत

80
2224 views