मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मोर्चासाठी जढाळा गावात चावडी बैठक
नवनाथ डिगोळे प्रतिनिधी
चाकूर (प्रतिनिधी) :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे जाणाऱ्या मोठ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चाकूर तालुक्यातील जढाळा गावात चावडी बैठक घेण्यात आली.
या बैठकीस मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी मोर्चा यशस्वी व्हावा तसेच लातूर जिल्ह्यातून ठाम पवित्र्यासह मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, यासाठी या बैठकीत नियोजन करण्यात आले.
बैठकीदरम्यान वक्त्यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडत, समाजाच्या एकतेचे महत्व अधोरेखित केले. “मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरू राहील,” असा निर्धार बांधवांनी व्यक्त केला.
ठळक मुद्दे :
29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे मोर्चा
लातूर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने सहभाग अपेक्षित
जढाळा गावातील चावडी बैठकीत उत्स्फूर्त प्रतिसाद
मराठा बांधव एकतेचा निर्धार