logo

"साताऱ्यात पालकमंत्री कार्यालय सुरू – तक्रारींना थेट न्याय मिळणार


सातारा : शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५

जुन्या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाचे नुतनीकरण करून त्या ठिकाणी पालकमंत्री कार्यालय सुरू करण्यात आले आहे. ऐतिहासिक सौंदर्य जपत अत्यंत आकर्षक पद्धतीने सजविलेल्या या कार्यालयाचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी संपन्न झाले.

उद्घाटनाचा मान पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय लष्करातील माजी सैनिकांना दिला. त्यांच्या शुभहस्ते कार्यालयाचे उद्‌घाटन झाले. या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्वांच्या सदिच्छा स्वीकारून नागरिकांशी संवाद साधला.

या प्रसंगी त्यांनी सांगितले की –
"पालकमंत्री कार्यालयात बसण्याचा मान पहिल्यांदा स्वातंत्र्यसैनिक व माजी सैनिकांना देण्याची आमची इच्छा होती. आज त्यांच्या हस्ते हे उद्घाटन झाल्याचा आम्हाला आनंद आहे. येत्या १० दिवसांत अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक होईल. नागरिकांच्या तक्रारी व प्रश्नांची रितसर दखल घेतली जाईल आणि त्यांचे समाधान करण्यात येईल. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या समस्या निर्धास्तपणे येथे मांडाव्यात."

या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


10
68 views