
स्वतंत्र दिनांनिमित्त व कालकथित सिंधुताई आदिनाथ लांडगे स्मरणार्थ आरोग्य शिबीराचे आयोजन.
कोंढवे -धावडे :सविस्तर स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून कालकथित सिंधुताई आदिनाथ लांडगे स्मरणार्थ आरोग्य शिबीर भरवण्यात आले. या शिबिरात नेत्र तपासणी, शुगर तपासणी व सर्व बॉडी चेकउप मोफत करून देण्यात आले. याकामी सिल्वर बर्च हॉस्पिटल च्या वतीने सौं सोनाली दीक्षित, डॉ संतोष कावळे, सौं योगिता, नर्स प्रतीक्षा व इतर सहायक यांनी काम पहिले.नेत्र तपासणी साठी जतन फाउंडेशन यांच्या वतीने रवींद्र झेंडे,
पवन मुऱ्हाडे,निशा भिलावेकर यांनी काम पहिले.
. या सुविधा चा लाभ परिसरातील एक हजार नागरिकांनी घेतला. यनिमित्त मोफत चेष्मे वाटप करण्यात आले व एक वर्षा चे शुगर चेकअप कार्ड देण्यात आले. या कार्यक्रमाला सर्व पक्षाचे मान्यवर व परिसरातील नेते मंडळी यांनी विषय भेट देऊन सहकार्य केले.मा.स्वीकृत नगरसेवक श्री सचिन दांगट, मा.श्री सर पाटील, मा.श्री अतुल धावडे, मा. श्री नितीन धावडे. मा श्री अतुल दांगट, मा. श्री विकास दांगट, .खडकवासला सेना प्रमुख मा. श्री संतोष शेलार, मा. श्री. विठ्ठल वांजळे, मा.श्री विकास नाना दांगट, आदी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून श्री प्रशांत लांडगे व श्री. प्रवीण लांडगे यांनी उत्तमरित्या व्यवस्थापन केले. या सुविधा मोफत दिल्या बद्दल नागरिकांनी त्यांचे आभार मानले.