logo

मिले सूर मेरा तुम्हारा 14 ऑगस्ट - स्वतंत्र दिनाची पूर्व संध्या....... देश भक्तीपर गाणी अप्रतिम संध्याकाळ १ ४ ऑगस्ट २ ० २ ५

नमस्कार मी मानसी फडके , विनता सोशिअल मध्ये आपले स्वागत स्वातंत्र दिनाच्यापूर्वसंध्ये निमित्त , आर्ट सर्कल देवगड आणि स्वरऋतु वाडा यांच्या संयुक्त सहकार्याने देशभक्तीपर गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर झाला. बहारदार हे सर्वसाधारण विशेषण झालं खरंतर अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम कार्यक्रम सादर झाला किंबहुना सादर केला हे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल . आताच्या काळात संगीत कार्यक्रम म्हणजे सर्व संगीत तज्ज्ञ असून चालत नाहीत तर तांत्रिक जाणकार हि असावे लागतात . कार्यक्रम सुरु व्हायच्या अगोदर प्रत्येक गायकाने आलाप घेऊन प्रत्येक गायकाचा आवाज समायोजित करून घेतला . अर्थातच sound system हाताळणाराही माहितगार असल्यामुळे आवाजही अप्रतिम.सगळ्यात कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे सोलो गाणी म्हणण्याच्या भानगडीत न पडता बहुतांश गाणी कोरस म्हटली . अर्थात देशभक्तीपर गाणी असल्यामुळे सोलो गाणी नाही म्हटली तरी फारसा फरक पडत नाही . जे हा कार्यक्रम बघायला किंबहुना ऐकायला आले नाहीत ते खरंच एका उत्तम कार्यक्रमाला मुकले . गायकही उत्तम होते . शूरा मी वंदिले सावनी शेवडे यांनी कार्यक्रमाची सुरवात उत्तम गायकीने केली . तसेच सैनिक हो तुमच्या साठी हे गाणं राधा जोशी यांनी उत्कृष्ठ म्हटलं. तसेच स्वरऋतु चे हर्षद जोशी त्यांच्याबद्दल काय सांगावं ते तर संगीत बरोबर घेऊनच जन्माला आले असे वाटते कवितांना चाली उत्तम लावणं आणि कमीतकमी साहित्यात संगीताची उत्कृष्ठ निर्मिती कशी करावी हे त्यांच्याकडून शिकावं प्रसाद जाखी सर आणि सचिन जाधव सरांनी कार्यक्रमात खूप सुंदर रंग भरले.प्रसाद शेवडे सर काही सोलो कम कोरस गाणी उत्तम . एकूणच स्वातंत्र दिनाची पूर्व संध्या लाजवाब गेली असे म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही .
चला तर पुन्हा भेटूया अश्याच एका उपक्रमाची माहिती घेऊन . नमस्कार मी मानसी फडके , विनता सोशिअल मध्ये आपले स्वागत स्वातंत्र दिनाच्यापूर्वसंध्ये निमित्त , आर्ट सर्कल देवगड आणि स्वरऋतु वाडा यांच्या संयुक्त सहकार्याने देशभक्तीपर गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर झाला. बहारदार हे सर्वसाधारण विशेषण झालं खरंतर अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम कार्यक्रम सादर झाला किंबहुना सादर केला हे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल . आताच्या काळात संगीत कार्यक्रम म्हणजे सर्व संगीत तज्ज्ञ असून चालत नाहीत तर तांत्रिक जाणकार हि असावे लागतात . कार्यक्रम सुरु व्हायच्या अगोदर प्रत्येक गायकाने आलाप घेऊन प्रत्येक गायकाचा आवाज समायोजित करून घेतला . अर्थातच sound system हाताळणाराही माहितगार असल्यामुळे आवाजही अप्रतिम.सगळ्यात कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे सोलो गाणी म्हणण्याच्या भानगडीत न पडता बहुतांश गाणी कोरस म्हटली . अर्थात देशभक्तीपर गाणी असल्यामुळे सोलो गाणी नाही म्हटली तरी फारसा फरक पडत नाही . जे हा कार्यक्रम बघायला किंबहुना ऐकायला आले नाहीत ते खरंच एका उत्तम कार्यक्रमाला मुकले . गायकही उत्तम होते . शूरा मी वंदिले सावनी शेवडे यांनी कार्यक्रमाची सुरवात उत्तम गायकीने केली . तसेच सैनिक हो तुमच्या साठी हे गाणं राधा जोशी यांनी उत्कृष्ठ म्हटलं. तसेच स्वरऋतु चे हर्षद जोशी त्यांच्याबद्दल काय सांगावं ते तर संगीत बरोबर घेऊनच जन्माला आले असे वाटते कवितांना चाली उत्तम लावणं आणि कमीतकमी साहित्यात संगीताची उत्कृष्ठ निर्मिती कशी करावी हे त्यांच्याकडून शिकावं प्रसाद जाखी सर आणि सचिन जाधव सरांनी कार्यक्रमात खूप सुंदर रंग भरले.प्रसाद शेवडे सर काही सोलो कम कोरस गाणी उत्तम . एकूणच स्वातंत्र दिनाची पूर्व संध्या लाजवाब गेली असे म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही .
चला तर पुन्हा भेटूया अश्याच एका उपक्रमाची माहिती घेऊन .
Vinata Social Media

26
4936 views