logo

नाशिक येथे लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न ..

नाशिक येथे लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

पाचोरा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष Aima Media:-
स्त्री म्हणून आज तिला तिच्या घरात मान आहे, माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीचा मला सार्थ अभिमान आहे...!
मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेने लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.लाडकी बहीण योजनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. ही योजना सुरूच होणार नाही, दोन महिन्यात बंद पडेल, निवडणुकीनंतर बंद पडेल असे म्हणत म्हणत विरोधक थकले मात्र पाहता पाहता ही योजना एक वर्ष महायुती सरकारने यशस्वीरीत्या राबवून दाखवली. ही योजना कधीही बंद होणार नाही असे याप्रसंगी पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगितले.

यावेळी मंत्री गिरीश भाऊ महाजन व आमदार सौ. सीमा हिरे, ज्येष्ठ नेते श्री. लक्ष्मण सावजी, श्री. सुनील बागुल, श्री. सुधाकर बडगुजर यांच्यासह महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी तसेच लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

0
0 views