
श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
दिनांक: १५ ऑगस्ट, २०२५
शिवाजीनगर तांडा: श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ, मेवापूर तांडा यांच्या अंतर्गत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रम शाळा, शिवाजीनगर तांडा येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे प्राचार्य श्री. तानाजी रामराव राठोड उपस्थित होते. यासोबतच शिवाजीनगर तांडा, डोंगरेवाडी तांडा आणि वाघमारी तांडा येथील प्रतिष्ठित नागरिक व पालक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. जयपाल राठोड (मुख्याध्यापक, श्री शिवाजी प्राथमिक आश्रम शाळा) यांनी केले. कार्यक्रमाची पुढील रूपरेषा श्री. होणशेट्टे सर (स. शि.) यांनी सादर केली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कवायत आणि लेझीमने उपस्थितांची मने जिंकली. यासाठी श्री. हंबीरे सर, श्री. गव्हाणे सर आणि श्री. प्रताप सर यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (फेसबुक लाईव्ह) श्री. शेख सर, श्री. ज्ञानोबा केंद्रे सर आणि श्री. बारमाळे सर यांनी केले.
शेवटी, श्री. पाटील सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. गावातील नागरिक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला, ज्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.