logo

जवान धम्मपाल इंगळे यांच्याकडून महाळुंगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डायस व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य देणगी स्वरूपामध्ये वाटप.

*जवान धम्मपाल इंगळे यांच्याकडून महाळुंगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डायस व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य देणगी स्वरूपामध्ये वाटप.*
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा महाळुंगी येथे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा चांगल्या प्रकारे पार पडण्यात आला यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतरशाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय रविंद्र भाऊ डीवरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. त्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीता गीतांच्या चालीवर विद्यार्थ्यांनी सामुदायिक कवायतीचे सादरीकरण केले त्यानंतर शाळेचे प्रधान अध्यापक श्री पेडवा सर यांनी प्रास्ताविकेतून जिल्हा परिषद शाळेची माहिती विशद केली. ग्रामपंचायत सदस्य पारेकर भाऊ यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर आपले विचार व्यक्त केले तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र भाऊ डिवरे यांनी सुद्धा भाषणातून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकार चे मार्गदर्शन केले .महाळुंगी येथील जवान धम्मपाल इंगळे यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डायस व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य देणगी स्वरूपामध्ये वाटप करण्यात आली. जवान धम्मपाल इंगळे आणि त्यांच्या आई-वडिलांनी शाळेसाठी उपयोगी असे डायस आणि विद्यार्थ्यांना उपयोगी पैसे देण्याचे ठरविल्याने त्यांचे सर्व नागरिकांतर्फे अभिनंदन करण्यात आले .त्यांच्या या कार्याबद्दल शाळेमध्ये त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच धम्मपाल इंगळे जवान यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी अशा प्रकारचे चांगल्या प्रकारची भाषण सादर केले तसेच महाळुंगी गावातील ज्यांनी आपले पुत्र देशाच्या सेवेसाठी सीमेवर पाठविलेले आहेत अशा महान माता-पितांचा सत्कार शाळेमध्ये करण्यात आला .स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व भाषणे सादर करण्यात आली .स्वातंत्र्य दिनाच्या सोहळा साजरा करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच सौ सीमाताई डिवरे तसेच उपसरपंच व ग्रामपंचायत सर्व सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य व गावातील ज्येष्ठ मंडळी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होती .श्री मुकेश सर यांच्याकडून कार्यक्रमाची बहारदार असे सूत्रसंचालन करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री चव्हाण सर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक जोशी मॅडम चव्हाण मॅडम गायगोळ मॅडम यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचे प्रयत्न केले .

15
1697 views