logo

79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

नांदेड सांगवी येथील क्युरिओसिटी स्कूल व उज्वल अकॅडमी मध्ये 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री गणेश पाथरकर,श्री धनाजी सुर्यवंशी सहसंपादक लोकहित न्यूज लाईव्ह चॅनल;श्री अनिल नरवाडे कृषी तज्ज्ञ ,श्री किरण कांबळे एम सी एन न्युज चॅनल नांदेड प्रतिनिधी, पालकप्रतिनिधी सौ.ललिता हैबते मॅडम,व क्युरिओसिटी स्कूल व उज्वल अकॅडमीचे संचालक प्रा. माधव खिल्लारे व सौ.आशा खिल्लारे आदींची उपस्थिती होती. सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून क्युरीओसिटी स्कूल व उज्वल अकॅडमीचे संचालक प्रा.माधव खिल्लारे यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला प्रणाम करून सर्वांनी राष्ट्रगितानी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.यानंतर क्युरिओसिटीचे विद्यार्थी अपूर्वा खिल्लारे,विराज खिल्लारे, कार्तिक नरवाडे, विराज कोकाटे, पंढरीनाथ डुमणे,विराश चढवणे व शिवम कोकाटे इत्यादी विद्यार्थ्यांनी तिन्हीं भाषेतून आपल्या भाषणातून देशासाठी लढणाऱ्या शूरवीरांच्या जीवनावर प्रकाश टाकून सांगवी परिसरातील सर्व श्रोत्यांना क्युरिओसिटी आपल्या पाल्याचा विकासासाठी सर्वोतोम पर्याय असल्याचे दाखवून दिले. व तसेच वेगवेगळ्या उपक्रम राबविण्यात नेहमी चर्चेत असणारे प्रा.माधव खिल्लारे सर व त्यांची उज्वल अकॅडमी व क्युरिओसिटी स्कूलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्य दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यापैकी रांगोळी स्पर्धेतील प्रथम क्रमांक कु.श्रध्दा भोसले, अनुष्का वाघमारे, व दिक्षा तळेगावकर , द्वितीय क्रमांक देवियानी पाथरकर व तृतीय क्रमांक कु.दिक्षा हैबते यांनी पटकावला याबद्दल तर सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.समिक्षा तळेगावकर द्वितीय क्रमांक कु.बुध्दप्रणाली गच्छे तर तृतिय क्रमांक कु.सृष्टी कोकाटे यांनी पटकावला याबद्दल त्यांना बक्षीस व सन्मान चिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले व तसेच आय एम ओ व एन एम एम एस व शिष्यवृत्ती परीक्षेतील व मार्च 2025मधील दहावी व बारावी उज्वल अकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांचा पुष्प गुच्छ देऊन सन्मान हा संचालक प्रा.माधव खिल्लारे ,सौ.आशा खिल्लारे व मुख्याध्यापिका अनुराधा काळे यांनी करून सर्वांना कार्यक्रमाला उपस्थित दर्शविल्याबददल आभार मानले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे पत्रकार किरण कांबळे यांनी प्रा. माधव खिल्लारे सरांच्या कार्याचे कौतुक करून आपलं लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष होत आहे असे गौरव उदगार काढले. कृषी तज्ज्ञ श्री अनिल नरवाडे यांनी सुध्दा प्रा.माधव खिल्लारे सरा व त्यांच्या टिमच्या कार्याचे कौतुक करत खिल्लारे सर हे चालत फिरत विद्यापीठ असल्याचे प्रतिपादन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलच्या व उज्वल अकॅडमीच्या शिक्षक जैस्वाल सर,उपरे सर नेहा मिस अंजली मिस संजना मिस कोकरे मिस गाढे मिस व चवणे मावशी यांनी परिश्रम घेतले

61
825 views