logo

रोटरी क्लब ऑफ लोणावळाआयोजित शहरातील विविध शाळांच्या देशभक्तीपर गीतांच्या स्पर्धा संपन्न..

रोटरी क्लब ऑफ लोणावळा,च्या वतीने सलग दुसऱ्या वर्षाला ही स्वातंत्र्य दिना चे औचित्य साधून कैवल्य विद्यानिकेतन तुंगार्ली ,येथे,लोणावळ्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतांच्या स्पर्धा, शुक्रवार दि. ८ .रोजी आयोजित करण्यात आल्या.
या स्पर्धांमध्ये लोणावळ्यातील ७ शाळांनी सहभाग घेतला होता. सुमारे २०० मुले मुलींचा यात सहभाग होता.
या प्रसंगी,लोणावळा शहर पोलिस स्टेशन चे पोलीस.उपनिरीक्षक,अनिल केरुरकर,कैवल्य विद्यानिकेतन डायरेक्टर डॉ.नारायणदत्त जोशी, नितीन कल्याण,सर्व शाळांमधील संगीत शिक्षक. .कैवल्य विद्यानिकेतन च्या प्रिंसिपल, भारती कावडे मॅडम, इ मान्यवर तसेच ,रोटरी क्लब ऑफ लोणावळा च्या प्रेसिडेंट,सौ.विजया नितीन कल्याण ,सेक्रेटरी, मुस्ताफा कॉन्ट्रॅक्टर,प्रोजेक्ट डायरेक्टर,तसनिम बोहरी.तसेच क्लब चे सन्माननीय सर्व सदस्य, इ मान्यवरांच्या उपस्थितीत ही स्पर्धा संपन्न झाली.
या देशभक्ती पर गीतांच्या स्पर्धेत वादक,विजय वाघचौरे,मंगेश कदम ,हार्मोनियम वादक शिक्षक,चेतन भैसानिया सर, परीक्षक म्हणून श्री.चंद्रकांत जोशी काका यांनी परीक्षण केले
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:-
५ वी ते ७ वी ग्रुप मध्ये प्रथम क्रमांक :-
सिंहगड पब्लिक स्कूल.
द्वितीय क्रमांक,:-
आंतरभारती बालग्राम.
तृतीय क्रमांक:-
कैवल्य विद्यानिकेतन .यांनी पटकावला.
८ वी ते १० वी ग्रुपमध्ये
प्रथम क्रमांक:- कैवल्य विद्यानिकेतन.
द्वितीय क्रमांक:-
गुरुकुल हायस्कूल.
तृतीय क्रमांक:-
ॲड.बापूसाहेब भोंडे स्कूल.
आणि विशेष बक्षिस, रायवूड इंटरनॅशनल स्कूल या शाळेला देण्यात आले..अशा उत्साहात आनंदात हा कार्यक्रम संपन्न झाला.

22
146 views