logo

*नाशिकमधील ब्लॉसम अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा*

प्रतिनिधी १५ ऑगस्ट (नाशिक) :- नाशिक मधील ब्लॉसम अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी दत्तनगर मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांची लांबच लांब रांग बघायला मिळाली. या प्रभात फेरीमध्ये नर्सरी पासून पुढील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रभातफेरीच्या वेळी जय जवान जय किसान, भारत माता की जय अशा प्रकारच्या अनेक देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या.

प्रभात फेरी झाल्यानंतर शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमास संचालक सिंघासने सर, हाडपे सर, प्रिन्सिपल साहो मॅडम तसेच शिक्षक आणि स्टाफ त्याचबरोबर दत्तनगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहण सिंघासने सरांच्या हस्ते झाले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांची अनेक देशभक्तीपर गीते, देशभक्तीपर भाषणे, देशभक्तीपर नृत्ये सादर करण्यात आली. काही संचालकांची तसेच शिक्षकांची भाषणे झाली. एका विद्यार्थ्याने भारतीय जवानाचा वेश परिधान केला होता तसेच एका विद्यार्थिनीने भारत मातेचा वेश परिधान केला होता. त्यामुळे या दोन विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांनुसार वेगवेगळी वेशभूषा केली होती.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षकांच्या आणि कार्यक्रमास आलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर स्वातंत्र्य दिनाचा आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. एकूणच स्वातंत्र्य दिनामुळे नाशिक मधील वातावरण आनंदमय झाले होते.

85
3852 views